Red Hat Enterprise Linux 5

5.6 प्रकाशन टिपा

नवीन गुणविशेष व मुख्य सुधारणा

चिन्ह

Red Hat Engineering Content Services

Legal Notice

Copyright © 2010 Red Hat.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
MySQL® is a registered trademark of MySQL AB in the United States, the European Union and other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
 RaleighNC 27606-2072 USA
 Phone: +1 919 754 3700
 Phone: 888 733 4281
 Fax: +1 919 754 3701

Abstract
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5 कार्य प्रणाली व या प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ऍप्लिकेशन्स् करीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करते. किर्कोळ प्रकाशनातील सर्व बदलांचे तपशील टिपा तांत्रीक टिपांमध्ये उपलब्ध आहे.

1. इंस्टॉलर
2. वर्च्युअलाइजेशन
3. नेटवर्किंग
4. वेब सर्व्हर्स् व सेवा
5. फाइलसिस्टम्स् व स्टोरेज
5.1. लॉजिकल वॉल्यूम मॅनेजर (LVM)
6. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि
7. डेस्कटॉप
8. कर्नल
9. डिव्हाइस ड्राइव्हर्स्
9.1. नेटवर्क डिव्हाइस ड्राइव्हर्स्
9.2. स्टोरेज डिव्हाइस् ड्राइव्हर
9.3. डेस्कटॉप ड्राइव्हर्स् सुधारणा
9.4. छपाईयंत्र ड्राइव्हर्स्
10. डेव्हलपर साधने
A. आवृत्ती इतिहास

1. इंस्टॉलर

Red Hat Enterprise Linux इंस्टॉलर (anaconda असेही म्हटले जाते) Red Hat Enterprise Linux 5 च्या प्रतिष्ठापनात सहकार्य करतो.
किकस्टार्ट रिट्राय रेपॉजिटरी डाउनलोड गुणविशेष
Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापीत करण्यासाठी प्रणाली प्रशासकाद्वारे वापरण्याजोगी प्रतिष्ठापन पद्धतीला किकस्टार्ट करा. किकस्टार्टचा वापर करून, एक फाइल निर्माण केली जाते, ज्यामध्ये सहसा प्रतिष्ठापनवेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाविष्टीत असतात.
किकस्टार्ट प्रतिष्ठापनवेळी काहिक घटनांमध्ये, इंस्टॉलर तात्पुर्ते अनुपलब्ध रेपॉजिटरीपासून संकुल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू शकतो (उ.दा. ओव्हरलोडेड् Red Hat Network Satellite). परिणामतः, Red Hat Enterprise Linux 5 च्या पूर्वीच्या प्रकाशनात, पुनः डाउनलोड किंवा पूर्णपणे रद्द करण्यासाठी वापरकर्त्याचे इंपुट आवश्यक असे. Red Hat Enterprise Linux 5.6 बिटामधील इंस्टॉलर रेपॉजिटरीसह जोडणीकरीता स्वयं एकापेक्षा जास्त प्रयत्न करतो व उपलब्ध असल्यावर आवश्यक संकुल डाउनलोड करतो.
प्रगत ड्राइव्हर समर्थन
प्रतिष्ठापन प्रक्रियावेळी आवश्यक साधनांकरीता Red Hat Enterprise Linux 5.6 Beta गुणविशेष सुधारीत ड्राइव्हर समर्थन. या प्रकाशनकरीता इंस्टॉलरमध्ये खालील ड्राइव्हर्स् व साधनांकरीता समर्थन समाविष्ट केले आहे:
  • ब्रोकेड 10G PCIe इथरनेट कंट्रोलर्स् करीता ब्रोकेड BNA इथरनेट कंट्रोलर ड्राइव्हर.
  • Chelsio Terminator4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्स् करीता cxgb4 ड्राइव्हर.
  • LSI 3ware 97xx SAS/SATA RAID कंट्रोलर्स् करीता 3w-sas ड्राइव्हर.
Red Hat Enterprise Linux 5.6 मधील इतर ड्राइव्हर सुधारणांची चर्चा Section 9, “डिव्हाइस ड्राइव्हर्स्” येथे केली आहे

टिप — पुढील वाचन

Red Hat Enterprise Linux 5 प्रतिष्ठापन पुस्तिका इंस्टॉलर व प्रतिष्ठापन प्रक्रियाविषयी तपशीलमध्ये दस्तऐवजीकरण पुरवते.

2. वर्च्युअलाइजेशन

पॅरा-वर्च्युअलाइज्ड् ड्राइव्हर्स्
पॅरा-वर्च्युअलाइज्ड् ड्राइव्हर्स् (virtio ड्राइव्हर्स्) वर्च्युअल मशीनचे ब्लॉक व नेटवर्क साधनांची कार्यक्षमता वाढवते.
virtio बलून ड्राइव्हर अतिथीला हायपरवाइजरद्वारे आवश्यक स्मृतीची मागणी करण्यास परवानगी देते. बलून ड्राइव्हर यजमानला उत्तमरित्या स्मृती वाटप करण्यास व इतर अतिथी व कार्यकरीता मोकळ्या स्मृतीचे वाटप करण्यास परवानगी देते. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, virtio बलून ड्राइव्हर स्मृतीचे आकडेवारी गोळा व कळवू शकतो.
libvirt
Libvirt हायपरवायजर-स्वतंत्र वर्च्युअलाइजेशन API आहे जे अनेक कार्य प्रणालीतील वर्च्युअलाइजेशन क्षमतासह संपर्क साधण्यास मदत पुरवते. libvirt हे यजमानवर वर्च्युअलाइज्ड् अतिथी सुरक्षितपणे व्यवस्थापीत करण्यास एक सामान्य, सामान्य, मुळतः व स्थीर परत आहे.
Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, libvirt ला आवृत्ती 0.8.2 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे sVirt सुरू होते. sVirt तंत्र Red Hat Enterprise Linux 5 मध्ये समाविष्टीत आहे ज्यात SELinux व वर्च्युअलाइजेशन एकत्र केले आहे. sVirt सुरक्षामध्ये सुधारणा आणतो व प्रणालीला हायपरवायजरमधील बग्स् विरूद्ध मजबूत करतो ज्यांस यजमान किंवा इतर वर्च्युअलाइज्ड् अतिथीकरीता अटॅक वेक्टर म्हणून वापरे जाऊ शकते.
pvclock करीता ग्लोबल सिंक्रोनाइजेशन पॉईंट
pvclock अतिथीला यजमानाचे घड्याळ वेळ वाचण्यास समर्थीत करतो. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, ग्लोबल सिंक्रोनाइजेशन पॉईंट pvclock मध्ये समाविष्ट केले जाते, ज्यामुळे अतिथीकरीता आणखी स्थिर वेळ स्रोत पुरवले जाते.
virtio-serial
virtio-serial ड्राइव्हर समाविष्ट केले गेले आहे, ज्यामुळे Red Hat Enterprise Linux 6 यजमानवरील कार्यरत Red Hat Enterprise Linux 5.6 अतिथींकरीता vmchannel क्षमता सुरू केली जाते. VMchannel ट्रांस्पोर्ट पद्धती आहे ज्याचा वापर यजमान वापरक्षेत्र अतिथी वापरक्षेत्र अंतर्गत संपर्क करीता केला जातो.

3. नेटवर्किंग

बर्कले इंटरनेट नेम डोमैन (BIND)
बहुतांश आधुनिक नेटवर्क्स्, इंटरनेट समाविष्टीत, वापरकर्ते इतर संगणकांना नावाद्वारे ओळखतात. यामुळे वापरकर्त्यांना नेटवर्क स्रोतचे संख्यायीक नेटवर्क पत्ते लक्षात ठेवायची आवश्यकता भासत नाही. या प्रकारचे नेम-बेस्ड् कनेकशंस् स्वीकारण्यासाठी नेटवर्क संरचीत करण्याचे सर्वात उत्तम पर्याय म्हणजे डोमेन नेम सर्व्हिस (DNS) किंवा नेमसर्व्हर सेट करणे, ज्यामुळे नेटवर्कवरील यजमाननावांचे संख्यायीक पत्ते व उलट यांचे निर्धारण होते.
बर्कले इंटरनेट नेम डोमैन (BIND) DNS प्रोटोकॉल्स्चे लागूकरण आहे. BIND मध्ये DNS सर्व्हर, एक रिसॉल्वहर लाइब्ररी, व DNS सर्व्हर योग्यपणे कार्य करत आहे याची तपासणी करणारे साधने समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 बिटामध्ये BIND लागूकरणची आवृत्ती 9.7 समाविष्टीत आहे. हे सुधारीत संकुले नेक्स्ट सेक्युर (NSEC3) च्या आवृत्ती 3 DNS सेक्युरिटी एक्सटेंशन्स् (DNSSEC) मधील स्रोत रेकॉर्डकरीता समर्थन समाविष्ट करतात. तसेच, या सुधारणामध्ये DNSSEC मधील RSA/SHA-2 अल्गोरिदम्स्, ट्रांजॅक्शन सिगनेचर्स् (TSIG) मध्ये HMAC-SHA2 अल्गोरिदम्स् करीता समर्थन पुरवतात.
dropwatchचा वापर करणारे नेटवर्क डिबगिंग
कर्नल गुणविशेषमध्ये Netlink Drop Monitor (DROP_MONITOR) सर्व्हिस समाविष्टीत आहे जे तपशील नेटवर्क पॅकेट लॉस मॉनिटरिंग पुरवते. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये नवीन dropwatch युटिलिटि आहे जे ड्रॉप मॉनिटर सर्व्हिससह संवाद पुरवते, व परिणाम वापरकर्ताक्षेत्रकडे पाठवले जातात.
इथरनेट ब्रिज टेबल्स्
इथरनेट ब्रिज टेबल्स् (ebtables) फायरवॉलिंग साधन आहे ज्यामुळे ब्रिजद्वारे जाणारे नेटवर्क ट्राफिकची चाळणी केली जाते. चाळण्याची क्षमता लिंक लेयर फिल्टरिंगपर्यंत मर्यादित असते व मुळ फिल्टरिंग उच्च नेटवर्क नेटवर्क स्तरांवर आधारीत असते. Red Hat Enterprise Linux 5.6 प्रकाशनकरीता ebtables नवीन संकुल आहे.

4. वेब सर्व्हर्स् व सेवा

हायपरटेक्स्ट प्रिप्रोसेसर (PHP) 5.3
हायपरटेकस्ट प्रिप्रोसेसर (PHP) HTML-एंम्बेडेड् स्क्रिप्टिंग भाषा आहे ज्यांस सहसा Apache HTTP वेब सर्व्हरसह वापरले जाते. PHP ची आवृत्ती 5.3.2 आत्ता Red Hat Enterprise Linux 5.6 Beta मध्ये वेगळे php53 संकुल म्हणून उपलब्ध केले आहे.

Note

php संकुल PHP ची आवृत्ती 5.1.6 पुरवते, व अजूनही Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये उपलब्ध आहे. php53 प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी php संकुल व आवश्यक अवलंबन काढून टाकले आहे याची खात्री करा.
mod_nss
mod_nss नेटवर्क सेक्युरिटी सर्व्हिसेस् (NSS) सेक्युरिटी लाइब्ररीचा वापर करून, Apache वेब सर्व्हरकरीता Secure Sockets Layer (SSL) व Transport Layer Security (TLS) प्रोटोकॉल्स् द्वारे मजबूत क्रिप्टोग्राफि पुरवतो. या प्रकाशनात, mod_nss यांस आवृत्ती 1.0.8 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे ऑनलाइन सर्टिफिकेट सटेटस् प्रोटोकॉल (OCSP) करीता समर्थन पुरवले जाते

5. फाइलसिस्टम्स् व स्टोरेज

फोर्थ एक्सटेंडेड् फाइलसिस्टम् (ext4) समर्थन
फोर्थ एक्सटेंडेड् फाइलसिस्टम् (ext4) आत्ता Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये पूर्णतया समर्थीत गुणविशेष आहे. ext4 थर्ड एक्सटेंडेड् फाइलसिस्टम् (ext3) यावर आधारीत आहे व अनेक सुधारणा समाविष्टीत आहे, जसे कि: मोठ्या फाइल आकारकरीता समर्थन व ऑफसेट, वेगवान व अधिक कुशलतेने डिस्क जागेचे वाटप, डिरेक्ट्री अंतर्गत उपडिरेक्ट्रीज् वर बंधन नाही, वेगवान फाइल प्रणालीची तपासणी, व अधिक मजबूत जर्नलिंग.
Hat Enterprise Linux 5.6 बिटामध्ये ext4 चे पूर्णतया समर्थीत फाइलप्रणाली म्हणून समावेश करण्यासाठी, e4fsprogs संकुलला नुकतेच अपस्ट्रिम आवृत्तीसह सुधारीत केले आहे. e4fsprogs मध्ये ext4 फाइलप्रणाली निर्माण, संपादित, तपासण्यास, व योग्य करण्यास युटिलिटिज समाविष्टीत आहे.

Note

मागील Red Hat Enterprise Linux 5 प्रकाशनांमध्ये, ext4 फाइलसिस्टम तंत्रज्ञान पूर्वावलोकन गुणविशेष म्हणून समाविष्ट केले गेले होते व ext4dev यानावाने परिचीत आहे.

5.1. लॉजिकल वॉल्यूम मॅनेजर (LVM)

लॉजिकल स्टोरेज वॉल्यूम्स् निर्माण करून वॉल्यूम मॅनेजमेंट फिजिकल स्टोरेजवरील एक अपारदर्शी स्तर निर्माण करते. यामुळे फिजिकल स्टोरेज प्रत्यक्षरित्या वापरण्यास जास्त सुलभता प्राप्त होते. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये लॉजिकल वॉल्यूम मॅनेजर (LVM) चा वापर करून लॉजिकल वॉल्यूम्स व्यवस्थापीत केले जाते.

पुढील वाचन

लॉजिकल वॉल्यूम मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन दस्तऐवज LVM लॉजिकल वॉल्यूम मॅनेजरचे वर्णन करतो, ज्यामध्ये क्लस्टर्ड वातावरणात LVM चालवण्याविषयी माहिती समाविष्टीत आहे.
मिरर लॉग्स्ला मिरर करणे
LVM एक छोटेसे लॉग ठेवतो (वेगळ्या साधनावर) ज्याचा वापर मिरर किंवा मिरर्ससह कोणते क्षेत्रांची समजुळवणी, नियंत्रण शक्य आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये हे लॉग साधन मिरर करण्याची क्षमता पुरवते.
मिररचे अनावश्यक इमेज विभागीत करणे
मिररड् लॉजिकल वॉल्यूमचे अनावश्यक इमेज विभागीत करण्यासाठी व नवीन लॉजिकल वॉल्यूम निर्माण करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये lvconvert आदेशमधील --splitmirrors घटकाचा वापर केला गेला आहे.
संरचना
Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, पूर्वनिर्धारीत डाटा संरेषन व वॉल्यूम ग्रूप मेटाडेटाकरीता LVM अगाऊ संरचना पर्याय पुरवतो.

6. प्रमाणीकरण व इंटरऑपरेबिलिटि

सिस्टम सेक्युरिटि सर्व्हिसेस् डिमन (SSSD)
सिस्टम सेक्युरिटि सर्व्हिसेस् डिमन (SSSD) Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये नवीन गुणविशेष आहे जे ओळख व प्रमाणीकरणकरीता सेवांचा संच लागू करते. ओळख व प्रमाणीकरण सेवांना केंद्र करून आयडेंटिटिजचे स्थानीय कॅशिंग, सर्व्हरशी जोडणी खंडीत असल्यावरही वापरकर्त्यांची ओळख पटवणे शक्य आहे. SSSD अनेक प्रकारचे ओळख व प्रमाणीकरण सेवांना समर्थन पुरवतो, ज्यामध्ये: Red Hat Directory Server, Active Directory, OpenLDAP, 389, Kerberos व LDAP समाविष्टीत आहे.
Samba
Samba कार्यक्रमांचा संच आहे जे फाइल्स्, छपाईयंत्रे व इतर माहितीचा मिळून वापरणे शक्य करण्यास NetBIOS ओव्हर TCP/IP (NetBT) याचा वापर करते. हे संकुल सर्व्हर मेसेज ब्लॉक किंवा SMB सर्व्हर (ज्यांस कॉमन इंटरनेट फाइल सिस्टम किंवा CIFS सर्व्हर, असेहि म्हटले जाते) पुरवते जे SMB/CIFS क्लाएंटस्ला नेटवर्क सेवा पुरवू शकते.
Samba (samba किंवा samba3x संकुलांद्वारे पुरवले गेलेले) चे दोन वेगळे स्वतंत्र आवृत्ती उपलब्ध आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये samba3x यांस आवृत्ती 3.5.4 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे LDAP-आधारीत स्टोर्स् व Winbind ओव्हर IPv6 करीता अगाऊ समर्थन पुरवले जाते.

7. डेस्कटॉप

जपानिज IPA फाँट समर्थन
IPA फाँट Information-Technology Promotion Agency, Japan, द्वारे पुरवलेला JIS X 0213:2004 सहत्व जपानिज OpenType फाँट आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये नवीन ipa-gothic-fonts संकुल समाविष्टीत आहे, ज्यामध्ये Gothic (sans-serif) शैलीचा फाँट व नवीन ipa-mincho-fonts संकुल, Mincho-शैलीचा फाँट समाविष्टीत आहे.
टॅबलेट समर्थन
Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये Wacom Cintiq 21UX2 ग्राफिक्स् टॅबलेट करीता समर्थन समाविष्टीत आहे.
ghostscript
घोस्टस्क्रिप्ट संच PostScript(TM) इंटरप्रिटर, C प्रोसिजर्स् (घोस्टस्क्रिप्ट लाइब्ररी, जे ग्राफिक्स् क्षमताPostScript भाषामध्ये लागू करते) चा संच, व PDF फाइल्स् करीता इंटरप्रिटर पुरवते. घोस्टस्क्रिप्ट पोस्टस्क्रिप्ट कोडला अनेक सामान्य, बिटमॅप्पड् स्वरूपात, बहुतांश छपाईयंत्रे व डिस्पलेज् द्वारे पटकन समझण्यासारखे. यामुळे वापरकर्त्यांना PostScript फाइल्स् डिस्पले करणे व विना-PostScript छपाईयंत्रांवर छपाई करण्यास शक्य करते.
Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, ghostscript ला आवृत्ती 8.70 करीता सुधारीत केले आहे, ज्यामुळे OPVP 1.0 करीता समर्थन पुरवले जाते.

8. कर्नल

Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये शिप केलेल्या कर्नलमध्ये अनेक बग निवारण Linux कर्नलच्या सुधारणाकरीता समाविष्ट केले आहेत. या प्रकाशनकरीता प्रत्येक निवारण केलेल्या बगचे तपशील व कर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक सुधारणाकरीता, Red Hat Enterprise Linux 5.6 टेकनीकल टोटस् मधील कर्नल धडा पहा.
या प्रकाशनमधील कर्नलमध्ये सर्वात लक्षणीय सुधारणा व समावेशमध्ये खालिल समाविष्टीत आहे:
  • ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मॉड्यूल (TPM) माइक्रोकंट्रोलर्सकरीता tpm_tis ड्राइव्हर आत्ता स्वयं बूटवेळी लोड केले जातात.
  • AMD प्रोसेसर्स् वरील अक्चुअल पर्फामंस् क्लॉक् काऊंटर (APERF) व मक्सिमम क्वालिफाइड् पर्फामंस् क्लॉक् काऊंटर (MPERF) मॉडेल-स्पेसिफिक रेजिस्टर्स् (MSRs) करीता समर्थन समाविष्ट केले.
  • ITE-887x चिप्स् करीता समर्थन
  • Power PC प्लॅटफॉर्म्स् करीता VIO पावर व्यवस्थापन समर्थन
  • qeth ड्राइव्हरमध्ये OSX व OSM OSA CHPID प्रकार करीता समर्थन समाविष्ट केले
  • Updated ॲडवांस्ड् लिनक्स् साउंड आर्किटेक्चर - हाय डेफिनेशन ऑडिओ (ALSA-HDA) ड्राइव्हर्स् सुधारीत केले.
  • SystemTap ची आवृत्ती 1.3, एकाग्र कंपाइल-सर्व्हर क्लाएंट, ऑटोमॅटिक स्ट्रक्चर प्रेटि-प्रिंटिंग, वेगवान व सुधारीत स्टॅक बॅकट्रेसेस्, व नवीन चाचणी स्क्रिप्टस् पुरवतात.
  • सुधारीत कर्नल प्रोब्स् (kprobes) लागूकरण
  • सुधारीत प्रत्येक-कार्य आकडेवारी संवाद (taskstats)
  • TCP क्यूबिक कंजेस्टेड नियंत्रणकरीता नवीन समर्थन
  • networkin नेटवर्किंग स्टॅकमधील वन पॅकेट शेड्युलरकरीता नवीन समर्थन
  • दोन नेटवर्किंग ट्युनिंग घटके, ip_local_reserved_ports व ip_local_port_range घटक, वापरकर्त्यांना तिसरे-पक्षीय ॲप्लिकेशन्स् करीता पोर्ट आरक्षीत करण्यास परवानगी देणे, व परिचीत ऑफेंडिंग पोर्टस्ला ब्लॅकलिस्ट करणे.
  • /dev/zero साधनाचे ZERO_PAGE mmap वगळण्यासाठी /proc/sys/vm/vm_devzero_optimized घटक
  • iSCSI इनिशिएटर,व iSNS सर्व्हरमध्ये iSNSकरीता सुधारणा
  • kABI सुधारणा

9. डिव्हाइस ड्राइव्हर्स्

9.1. नेटवर्क डिव्हाइस ड्राइव्हर्स्

  • I/O AT (I/O अक्सिलरेशन टेकनॉलॉजी) व DCA ड्राइव्हर्स् सुधारीत केले आहे. I/O AT कॉपी कार्ये ऑफलोड करून नेटवर्क थ्रुपूट सुधारण्यासाठी Intel द्वारे पुरवलेले तंत्र आहे. डायरेक्ट कॅशे ॲकसेस् (DCA) एक I/O AT गुणविशेष आहे जे डाटाला प्रत्यक्षरित्या प्रोसेसर कॅशेमध्ये डिलिवर करू शकतो.
  • आत्ता Red Hat Enterprise Linux 5.6 Beta मध्ये ZyDAS ZD1211(b) 802.11a/b/g USB WLAN साधनकरीता zd1211 ड्राइव्हर समर्थीत आहे.
  • qlcnic ड्राइव्हर नुकतेच अपस्ट्रिम आवृत्ती करीता सुधारीत केले आहे
  • सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हर आवृत्ती 2.102.512r करीता सुधारीत केले आहे
  • ब्रॉडकॉम नेटएक्सट्रिम II नेटवर्क कार्डस् करीता bnx2 ड्राइव्हर यांस आवृत्ती 2.0.8 करीता सुधारीत केले आहे
  • ब्रॉडकॉम एव्हरेस्ट नेटवर्क साधनांकरीता bnx2x ड्राइव्हर यांस आवृत्ती 1.52.53-4 करीता सुधारीत केले आहे
  • NVIDIA nForce साधनांकरीता forcedeth इथरनेट ड्राइव्हरला नुकतेच अपस्ट्रिम आवृती करीता सुधारीत केले आहे
  • Intel PRO/1000 इथरनेट साधनांकरीता e1000e ड्राइव्हर यांस आवृत्ती 1.2.7-k2 करीता सुधारीत केले आहे
  • Cisco 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हर यांस आवृत्ती 1.4.1.2 करीता सुधारीत केले आहे
  • Intel गिगाबिट इथरनेट अडॅप्टर्स् करीता igb ड्राइव्हर सुधारीत केले आहे, ज्यामुळे PCI-AER करीता समर्थन पुरवले जाते
  • Intel 10 गिगाबिट PCI एक्सप्रेस् नेटवर्क साधनांकरीता ixgbe ड्राइव्हरला आवृत्ती 2.0.84-k2 करीता सुधारीत केले आहे
  • NetXen मल्टि पोर्ट (1/10) गिगाबिट नेटवर्क साधनांकरीता netxen ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.73 करीता सुधारीत केले आहे
  • QLogic 10 गिगाबिट PCI-E इथरनेट साधनांकरीता qlge ड्राइव्हरला आवृत्ती 1.00.00.25 करीता सुधारीत केले आहे
  • सोलारफ्लेअर ड्राइव्हर (sfc) यांस आवृत्ती 2.6.36-4c1 करीता सुधारीत केले आहे
  • ब्रॉडकॉम टिगॉन 3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राव्हरला आवृत्ती 3.108+ करीता सुधारीत केले आहे
  • Neterionचे X3100 सिरिज 10GbE PCIe साधनांकरीता vxge ड्राइव्हर यांस आवृत्ती 2.0.8.20182-k करीता सुधारीत केले आहे

9.2. स्टोरेज डिव्हाइस् ड्राइव्हर

  • HP स्मार्ट अरे कंट्रोलर्स् करीता cciss ड्राइव्हरला आवृत्ती 3.6.22.RH1 करीता सुधारीत केले आहे
  • qla4xxxqla4xxx ड्राइव्हरला आवृत्ती 5.02.03.00.05.06-d1 करीता सुधारीत केले आहे
  • ब्रॉडकॉम नेटएक्सट्रिम II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हर यांस आवृत्ती 2.1.3 करीता सुधारीत केले आहे
  • सर्व्हरइंजिंस् ब्लेडइंजिन 2 ओपन iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
  • Emulex फाइबर चॅनल होस्ट बस् अडॅप्टर्स् करीता lpfc ड्राइव्हर यांस 8.2.0.87 करीता सुधारीत केले आहे
  • ipr ड्राइव्हरला आवृत्ती 2.2.0.4 करीता सुधारीत केले आहे
  • 3w-sas ड्राइव्हरला आवृत्ती 3.26.00.028-2.6.18RH करीता सुधारीत केले आहे
  • 3ware SATA RAID कंट्रोलर्स् करीता 3w-xxxx ड्राइव्हर यांस आवृत्ती 2.26.08.007-2.6.18RH करीता सुधारीत केले आहे
  • Chelsio होस्ट बस अडॅप्टर्स् (HBAs) करीता cxgb3i ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
  • LSI मेगाRAID SAS कंट्रोलर्स् करीता megaraid_sas ड्राइव्हर यांस आवृत्ती 4.31 प्रमाणे सुधारीत केले
  • LSI पासूनचे SAS-2 गटाचे अडॅप्टर्स् करीता समर्थन पुरवणाऱ्या mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 05.101.00.02 प्रमाणे सुधारीत केले
  • QLogic फायबर चॅनल HBAs करीता qla2xxx ड्राइव्हर यांस आवृत्ती 8.03.01.05.05.06-k प्रमाणे सुधारीत केले

9.3. डेस्कटॉप ड्राइव्हर्स् सुधारणा

  • IronLake ग्राफिक्स् करीता अगाऊ समर्थनसह Intel इंटिग्रेटेड डिस्पले साधनांकरीता i810 ड्राइव्हर्स् सुधारीत केले आहे.
  • वोलारि Z9s साधनांकरीता अगाऊ समर्थनसह sis ड्राइव्हर सुधारीत केले आहे.
  • G200eH साधनकरीता अगाऊ समर्थनसह, Matrox व्हिडीओ साधनांकरीता mga ड्राइव्हर सुधारीत केले आहे.

9.4. छपाईयंत्र ड्राइव्हर्स्

  • HPLIP (Hewlett-Packard Linux इमेजिंग व प्रिंटिंग प्रोजेक्ट) संकुल HP छपाईयंत्रे व मल्टि-फंक्शन पेरिफेरल्स् करीता ड्राइव्हर्स् पुरवतो. HPLIP ची आवृत्ती 3.9.8 आत्ता वेगळे hplip3 संकुल म्हणून उपलब्ध आहे. लक्षात ठेवा hplip3 संकुल HPLIP ची नवीन आवृत्ती पुरवते ज्यांस Red Hat Enterprise Linux 5 मधील आवृत्तीच्या परस्पर प्रतिष्ठापीत करणे शक्य आहे. संबंधित आदेश ओळ युटिलिटिजला hp- ऐवजी hp3- सह प्रिफिक्स केले जाते, उदाहरणार्थ: hp3-setup.

10. डेव्हलपर साधने

GNU gettext
GNU gettext संकुल साधनांचा संच पुरवतो व कार्यक्रमांना एकापेक्षाजास्त भाषेत संदेश निर्माण करण्यास दस्तऐवजीकरण कार्यक्रम पुरवते. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये, gettext ला आवृत्ती 0.17 करीता सुधारीत केले आहे. लक्षात ठेवा java व libintl.jar चे समर्थन या सुधारीत अपस्ट्रिम gettext संकुलमध्ये अशक्य केले आहे.
सबवर्जन
सबवर्जन (SVN) कंकरंट वर्जन कंट्रोल सिस्टम आहे जे एक किंवा जास्त वापरकर्त्यांना सर्व बदलावांचा इतिहासच्या व्यतिरिक्त फाइल्स् व डिरेक्ट्रीची क्रमवारी जपण्यास मदत पुरवते. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये सबवर्जनला आवृत्ती 1.6.11 करीता सुधारीत केले आहे, तसेच यामध्ये नवीन मर्ज ट्रॅकिंग व परस्पर मतभेद निवारन गुणविशेष समाविष्टीत आहे.
GDB मधील पायथन स्क्रिप्टिंग
हि सुधारणा GNU प्रोजेक्ट डिबगर (GDB) ची नवीन आवृत्ती पुरवते, ज्यामध्ये नवीन पायथन API समाविष्टीत आहे. या API मुळे, पायथन प्रोग्रामिंग भाषेतील स्क्रिप्टस् GDB ला ऑटोमेट होण्यास मदत करते.
पायथन API चा एक लक्ष्यणीय गुणविशेष म्हणजे पायथन स्क्रिप्टस्चा वापर करून GDB आउटपुटचे (यांस सहसा प्रिटि-प्रिंटिंग म्हणून ओळखले जाते) रूपण करण्याची क्षमता. पूर्वी, GDB मध्ये प्रिटि-प्रिंटिंगला मानक छपाई संरचनाचा वापर करून संरचीत केले जात असे. पसंतीचे प्रिटि-प्रिंटर स्क्रिप्टस् निर्माण करण्याची क्षमता वापरकर्त्याला ठराविक ॲप्लिकेशन्स् करीता GDB माहिती कसे दाखवतो याच्या नियंत्रणकरीता सुविधा पुरवतो. GNU स्टँडर्ड C++ लाइब्ररी (libstdc++) करीता Red Hat Enterprise Linux मध्ये प्रिटि-प्रिंटरचे संपूर्ण संच समाविष्टीत आहे.
GNU कंपाइलर कलेकशन (GCC)
GNU कंपाइलर कलेक्शन (GCC) मध्ये, इतरांच्या तुलनेत, C, C++, व Java GNU कंपाइलर्स् व संबंधित सपोर्ट लाइब्ररिज् समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये GCCची आवृत्ती 4.4 समाविष्टीत आहे, जे Red Hat Enterprise Linux 6 सह इंटरऑपरेबिलिटी पुरवते.
GNU C लाइब्ररी (glibc)
GNU C लाइब्ररी (glibc) संकुलांमध्ये मानक C लाइब्ररिज् समाविष्टीत असतात ज्यांस Red Hat Enterprise Linux मधील अनेक कार्यक्रमांद्वारे वापरले जाते. या संकुलांमध्ये मानक C व मानक माथ लाइब्ररिज समाविष्टीत असतात. या दोन लाइब्ररिजविना, Linux प्रणाली योग्यप्रमाणे कार्य करू शकत नाही.
Red Hat Enterprise Linux 5.6 मध्ये glibc सुधारीत केले, ज्यामुळे POWER7 व ISA 2.06 CPU करीता अगाऊ समर्थन पुरवले जाते.
OpenJDK
Red Hat Enterprise Linux 5.6 मधील OpenJDK यास IcedTea version 1.7.5 करीता सुधारित केले आहे. हि सुधारणा खालिल लक्षणीय समावेश पुरवतात:
  • हॉटस्पॉट स्थिरता व कार्यक्षमता सुधारणा
  • Xrender पाइपलाइन समर्थन
  • tzdataचा वापर करणारे दृष्यास्पद त्रुटी, सम वेळक्षेत्र समर्थन
  • सुधारीत ग्राफिक्स् फाइल समर्थन व सरासर JAR कार्यक्षमता
  • NUMA अलॉकेटर समर्थन

A. आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 0-23Tue Dec 07 2010Ryan लर्च
प्रारंभिक प्रकाशन टिपा