Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 5

5.9 प्रकाशन टिपा

Red Hat Enterprise Linux 5.9 करीता प्रकाशन टिपा

आवृत्ती 9

कायदेशीर सूचना

Copyright © 2012 Red Hat, Inc.

The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.

Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.

Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.

Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.

Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.

XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.

MySQL® is a registered trademark of MySQL AB in the United States, the European Union and other countries.

All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
RaleighNC 27606-2072 USA
Phone: +1 919 754 3700
Phone: 888 733 4281
Fax: +1 919 754 3701

सारांश

Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 5.9 प्रकाशन टिपा ह्या प्रकाशनकरीता Red Hat Enterprise Linux 5 कार्यप्रणाली व त्यावर चालणाऱ्या ऍप्लिकेशन्स् मधील मुख्य बदलांची नोंदणी करतो. ह्या किर्कोळ प्रकाशनातील सर्व बदलांचे तपशील टेक्निकल नोट्स् येथे उपलब्ध आहेत.
प्रस्तावना
1. हार्डवेअर समर्थन
2. कर्नल
3. डिव्हाइस ड्राइव्हर्स्
3.1. स्टोरेज ड्राइव्हर्स्
3.2. नेटवर्क ड्राइव्हर्स्
3.3. इतर ड्राइव्हर्स्
4. फाइल प्रणाली व स्टोरेज व्यवस्थापन
5. सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट
6. सुरक्षा व ओळखपटवणे
7. कंपाइलर व साधने
8. क्लस्टरिंग
9. वर्च्युअलाइजेशन
10. सामान्य सुधारणा
A. आवृत्ती इतिहास

प्रस्तावना

प्रकाशन टिपा Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व विस्तारचे उच्च स्तरीय माहिती पुरवतो. 5.9 सुधारणाकरीता Red Hat Enterprise Linux मध्ये लागू केलेल्या सर्व बदलांविषयी तपशील दस्तऐवजीकरणसाठी, टेक्निकल नोट्स् पहा.

धडा 1. हार्डवेअर समर्थन

ConnectX-3 साधनांकरीता mstflint समर्थन
mstflint संकुल, जे मेल्लनॉक्स् फर्मवेअर बर्णनिंग व डाइग्नोस्टिक्स् साधन पुरवतो, आता मेल्लनॉक्स् कनेक्टएक्स्-3 साधनांकरीता समर्थन पुरवतो.

HP स्मार्ट अरे कंट्रोलर्स् व मेगाRAID करीता smartmontools समर्थन
smartmontools संकुल, जे SMART-सक्षम हार्ड ड्राइव्हस् नियंत्रीत करण्यासाठी साधने पुरवतो. ह्या सुधारणामध्ये सुधारित मेगाRAID समर्थन देखील समाविष्टीत आहे.

ipmitool delloem आदेश सुधारित केले
Dell-निर्देशीत IPMI एक्सटेंशन, जे delloem उपआदेशला ipmitool युटिलिटिकरीता समाविष्ट करतो, यास खालील सुधारणा समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे:
  • नवीन vFlash आदेश, जे वापरकर्त्यांना विस्तारित SD कार्डस् विषयी माहिती दाखवण्यास परवानगी देते.
  • नवीन setled आदेश, जे वापरकर्त्यांना बॅकप्लेन LED स्तर दाखवण्यास परवानगी देते.
  • एरर वर्णन सुधारित केले.
  • नवीन हार्डवेअरकरीता समर्थन समाविष्ट केले.
  • ipmitool मॅन्युअल पृष्ठकरीता ipmitool delloem आदेशचे दस्तऐवजीकरण सुधारित केले आहे.

NetApp LUNs करीता संरचना सुधारित केले
NetApp LUN बिल्ट-इन संरचना आता पूर्वनिर्धारितपणे tur मार्ग चेकरचा वापर करतो. तसेच खालील हार्डवेअर तक्ता बाबींना सुधारित केले आहे:
  • flush_on_last_del सुरू केले आहे,
  • dev_loss_tmo यास 600 करीता ठरवले आहे,
  • fast_io_fail_tmo यास 5 करीता ठरवले आहे,
  • pg_init_retries यास 50करीता ठरवले आहे.

धडा 2. कर्नल

सिस्टम कॉल ट्रेसपॉइंट्स्
सिस्टम कॉल घटनांकरीता खालील ट्रेस्पॉइंट समाविष्ट केले आहे:
  • sys_enter
  • sys_exit

सिस्टम कॉल एंटर व एक्जिट ट्रेसपॉइंट्स् फक्त HAVE_SYSCALL_TRACEPOINTS संरचना पर्याय सुरू असलेल्या आर्किटेक्चर्सकरीता समर्थीत आहे.

IPv6 UDP हार्डवेअर चेकसम
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये IPv6 वरील चालणाऱ्या UDP करीता हार्डवेअर चेकसम समर्थन समाविष्टीत आहे.

दर-प्रोसेसकरीता रिसोअर्सेस् मर्यादा
/proc/<PID>/limits फाइल (ही फाइल आता लेखनजोगी आहे) तर्फे वापरकर्त्यांना कार्यरत प्रोसेसची मर्यादा बदलण्यासाठी prlimit64() सिस्टम कॉल समाविष्ट केले आहे.

pktgen करीता VLAN समर्थन समाविष्ट केले आहे
pktgen घटककरीता VLAN समर्थन समाविष्ट केले आहे. pktgen घटक आता 802.1Q टॅग्ड् फ्रेम्स् निर्माण करण्यास सक्षम आहे.

/proc/<PID>/ करीता प्रवेश थांबवत आहे
/proc/<PID>/ डिरेक्ट्रिजकरीता प्रवेश थांबवण्याकरीता procfs मध्ये hidepid=gid= माउंट पर्याय समाविष्ट केले आहे.

DSCP क्षेत्र मँगलिंग
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, netfilter घटक आता DSCP क्षेत्राचे मँगलिंगकरीता समर्थन पुरवतो.

धडा 3. डिव्हाइस ड्राइव्हर्स्

3.1. स्टोरेज ड्राइव्हर्स्

  • mptfusion ड्राइव्हरला आवृत्ती 3.04.20 करीता सुधारित केले आहे, जे खालील साधन ID समाविष्ट करते: SAS1068_820XELP.
  • QLogic फाइबर चॅनल HBAs करीता qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.04.00.05.05.09-k करीता सुधारित केले आहे.
  • qla4xxx ड्राइव्हरला आवृत्ती 5.02.04.05.05.09-d0 करीता सुधारित केले आहे.
  • एम्युलेक्स् फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्सकरीता lpfc ड्राइव्हरला आवृत्ती 8.2.0.128.3p करीता सुधारित केले आहे.
  • सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन 2 ओपन iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला आवृत्ती 4.2.162.0r करीता सुधारित केले आहे.
  • ब्रॉडकॉम नेटएक्सट्रिम II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.2.2 करीता सुधारीत केले आहे.
  • ब्रोकेड BFA FC SCSI ड्राइव्हर (bfa ड्राइव्हर) यापुढे टेक्नॉलजि प्रिव्ह्यु म्हणून गृहीत धरले जाणार नाही. Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, BFA ड्राइव्हर पूर्णतया समर्थीत आहे. या व्यतिरिक्त, ब्रोकेड bfa FC SCSI ड्राइव्हरला आवृत्ती 3.0.23.0 करीता सुधारित केले आहे ज्यामध्ये, इतरपैकी, खालील सुधारणा समाविष्टीत आहे:
    • फाइबर चॅनेल यजमानपासून लूप इनिशिअलाइजेशन प्रोटोकॉल (LIP) इश्यु करण्यासाठी समर्थन.
    • एक्सटेंडेड लिंक सर्व्हिसेस् (ELS) व कॉमन ट्रांस्पोर्ट (CT) फाइबर चॅनेल पासथ्रु आदेशांकरीता समर्थन.
    • IOCTL इंटरफेस समाविष्ट केले.
  • bfa फर्मवेअरला आवृत्ती 3.0.23.0 करीता सुधारित केले.
  • mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 13.101.00.00 करीता सुधारित केले, जे NUMA I/O समर्थन, वेगवान लोड समर्थन, व ग्राहक निर्देशीत ब्रँडिंगकरीता समर्थन समाविष्टीत करतो.
  • megaraid_sas ड्राइव्हरला आवृत्ती 00.00.06.15-rh करीता सुधारित केले आहे, जे डेल पावरएड्ज RAID कंट्रोलर (PERC) 9, LSI मेगाRAID SAS 9360/9380 12GB/s कंट्रोलर्स्, व बहु MSI-X वेक्टवर व मल्टि रिप्लाय क्युउकरीता समर्थन समाविष्ट करते.
  • iscsiuio driver for the ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II BCM5706/5708/5709 सिरिज् PCI/PCI-X गिगाबिट इथरनेट नेटवर्क इंटरफेस कार्ड (NIC) व ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II BCM57710/57711/57712/57800/57810/57840 सिरिज् PCI-E 10 गिगाबिट इथरनेट नेटवर्क इंटरफेस कार्डस्ला आवृत्ती 0.7.4.3 करीता सुधारित केले आहे, ज्यामध्ये, इतर सुधारणांपैकी, VLAN व राउटिंग समर्थन समाविष्टीत आहे.

3.2. नेटवर्क ड्राइव्हर्स्

  • Red Hat Enterprise Linux 5.9 सह शिप केलेल्या कर्नलकरीता ib_qib डिव्हाइस ड्राइव्हरकरीता समर्थन समाविष्ट केले आहे. ib_qib ड्राइव्हर, हे QLogicचे ib_ipath इंफिनिबँड होस्ट चॅनल अडॅप्टर (HCA) डिव्हाइस ड्राइव्हरची सुधारित आवृत्ती आहे (व अदलाबदल) व SDR, DDR, व QDR इंफिनिबँड अडॅप्टर्सच्या सर्वात नवीन PCI एक्सप्रेस QLE-सिरिज् करीता समर्थन पुरवतो.
  • सोलारफ्लेअर ड्राइव्हर (sfc) यास आवृत्ती 3.1 करीता सुधारित केले, जे SFE4003 बोर्ड व TXC43128 PHY करीता समर्थन पुरवते.
  • ब्रॉडकॉम 57710/57711/57712 चिप्सकरीता bnx2x फर्मवेअरला आवृत्ती 7.2.51 करीता सुधारित केले आहे.
  • bnx2x ड्राइव्हरला आवृत्ती 1.72.51-0+ करीता सुधारित केले आहे ज्यामुळे ब्रॉडकॉम 578xx चिप्सच्या फॅमिलि, iSCSI ऑफलोडकरीता समर्थन, अगाऊ PHYs (EEE समाविष्टीत) करीता समर्थन, OEM-निर्देशीत गुणधर्म, व अनेक बग्स्च्या निवारनकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
  • bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.11 करीता सुधारित केले आहे.
  • cnic ड्राइव्हर व फर्मवेअरला FCoE पॅरिटि एरर रिकव्हरि, स्टॅटिसटिक्स् समर्थन, व FCoE कार्यक्षमता आडव्हर्टाइजमेट समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
  • नेटवर्क साधनांकरीता चेलसिओ T3 फॅमिलिच्या cxgb3 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • चेलसिओ टर्मिनेटर4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्सकरीता cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे चेलसिओ T480-CR व T440-LP-CR अडॅप्टर्सकरीता समर्थन पुरवते.
  • cxgb4 फर्मवेअरला अपस्ट्रिम आवृत्ती 1.4.23.0 करीता सुधारित केले आहे.
  • iw_cxgb3 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • iw_cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • cxgb4i, cxgb3i, वlibcxgbi ड्राइव्हर्सला सुधारित केले आहे.
  • netxen_nic ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.79 करीता सुधारित केले आहे, ज्यामध्ये मिनिडम्प सपोर्ट समाविष्टीत आहे.
  • ब्रॉडकॉम टिगॉन3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.123 करीता सुधारित केले आहे.
  • इंटेल 10 गिगाबिट PCI एक्सप्रेस नेटवर्क साधनांकरीता ixgbe ड्राइव्हरला सर्वात नवीन आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे खालील सुधारणा समाविष्ट करते:
    • इंटेल इथरनेट 82599 10 गिगाबिट इथरनेट कंट्रोलरकरीता समर्थन.
    • इंटेल इथरनेट 82599 10 गिगाबिट इथरनेट कंट्रोलरवरील क्वॉड पोर्ट 10 गिगाबिट इथरनेट अडॅप्टरकरीता समर्थन.
    • विनाचाचणी व विनासुरक्षित सुधारित स्मॉल फॉर्म फॅक्टर प्लगेबल (SFP+) मॉड्युल्स् स्वीकारण्यासाठी मॉड्युल घटकाला (allow_unsupported_sfp) समाविष्ट केले.
  • सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारन समाविष्ट करण्यासाठी ixgbevf ड्राइव्हरला सर्वात नवीन आवृत्तीकरीता सुधारित केले आहे. या व्यतिरिक्त, 100MB लिंक वेग ओळखण्यासाठी समर्थन समाविष्ट केले आहे.
  • igbvf ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्ती 2.0.1-k-1 करीता सुधारित केले आहे.
  • इंटेल गिगाबिट इथरनेट अडॅप्टर्सकरीता igb ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे इंटेल इथरनेट नेटवर्क कनेक्शन I210 व इंटेल इथरनेट नेटवर्क कनेक्शन I211 करीता समर्थन पुरवते.
  • The e1000e driver for इंटेल 82563/6/7, 82571/2/3/4/7/8/9, व 82583 PCI-E कंट्रोलर्सच्या फॅमिलिला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, ज्यामध्ये इंटेल इथरनेट नेटवर्क कनेक्शन I217-LM समर्थन समाविष्टीत आहे.
  • bna ड्राइव्हर यापुढे टेक्नॉलजि प्रिव्ह्यु म्हणून गृहीत धरले जाणार नाही. Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, BNA ड्राइव्हर पूर्णतया समर्थीत आहे. या व्यतिरिक्त, BNA ड्राइव्हर व फर्मवेअरला आवृत्ती 3.0.23.0 करीता सुधारित केले आहे.
  • qlge ड्राइव्हरला आवृत्ती 1.00.00.30 करीता सुधारित केले आहे.
  • HP NC-Series QLogic 10 Gigabit सर्व्हर अडॅप्टर्सकरीता qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.29 करीता सुधारित केले आहे.
  • सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हरला आवृत्ती 4.2.116r करीता सुधारित केले आहे.
  • सिस्को 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.35+ करीता सुधारित केले आहे.

3.3. इतर ड्राइव्हर्स्

  • mlx4 ibnet ड्राइव्हर्सला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे. या व्यतिरिक्त, EEH एरर रिकव्हरिला mlx4 ड्राइव्हरमध्ये समर्थन समाविष्ट केले आहे.
  • mlx4_en ड्राइव्हरला आवृत्ती 1.5.3 करीता सुधारीत केले आहे.
  • mlx4_core ड्राइव्हरला आवृत्ती 1.0-ofed1.5.4 करीता सुधारीत केले आहे.
  • नवीन चिपसेटस् व HDA ऑडिओ कोडेक्सकरीता समर्थन सुरू किंवा सुधारीत करण्यासाठी ALSA HDA ऑडिओ ड्राइव्हरला सुधारीत केले आहे.
  • IPMI ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.

धडा 4. फाइल प्रणाली व स्टोरेज व्यवस्थापन

dmraid करीता FIPS मोड समर्थन
dmraid रूट साधनांसह FIPS मोडचा वापर करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 5.9 समर्थन समाविष्ट करतो. FIPS चेकसम तपासण्यापूर्वी dmraid साधन आता सुरू केले जाते.

धडा 5. सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट

RHN क्लासिक ते सबस्क्रिप्शन ॲसेट मॅनेजरकरीता स्थानांतरन
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, वापरकर्ते RHN क्लासिकपासून Red Hat सबस्क्रिप्शन ॲसेट मॅनेजर (SAM) करीता स्थानांतरीत होऊ शकतात. SAM सबस्क्रिप्शन माहिती व क्लाएंट मशीन्सवरील सॉफ्टवेअर सुधारणा हाताळण्याकरीता प्रॉक्सी म्हणून कार्य करते. माइग्रेशन प्रोसेसविषयी अधिक माहितीकरीता, सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट गाइड पहा.

बाहेरिल सर्व्हर्स् विरूद्ध नोंदणी करत आहे
प्रणालीची नोंदणी होतेवेळी रिमोट सर्व्हरच्या नीवडकरीता समर्थन आता सबस्क्रिप्शन मॅनेजरमध्ये समर्थीत आहे. सबस्क्रिप्शन मॅनेजर नोंदणी प्रोसेसवेळी, पोर्ट व प्रिफिक्ससह, सर्व्हरचे URL पसंत करण्यासाठी वापरकर्ता संवाद पर्याय पुरवते. या व्यतिरिक्त, आदेशओळपासून नोंदणी करताना, --serverurl चा वापर नोंदणी करण्यासाठीचे सर्व्हर निर्देशीत करण्यास शक्य आहे. ह्या गुणधर्मविषयी अधिक माहितीकरीता, सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट गाइड पहा.

फर्स्टबूट सिस्टम नोंदणी
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, फर्स्टबूट सिस्टम नोंदणीवेळी, Red Hat सबस्क्रिप्शन मॅनेजमेंटकरीता नोंदणी आता पूर्वनिर्धारित पर्याय आहे.

सबस्क्रिप्शन मॅनेजर gpgcheck वर्तन
रिकामे gpgkey आढळणाऱ्या कोणत्याहि रेपॉजटरिज्करीता आत्ता सबस्क्रिप्शन मॅनेजर gpgcheck बंद करतो. रेपॉजिटरि पुनःसुरू करण्यासाठी, GPG किज् अपलोड करा, व योग्य URL पसंतीच्या कंटेंट डेफिनेशनमध्ये समाविष्ट केले आहे याची खात्री करा.

सर्व्हर-साइड डिलिट्स्
कस्टमर पोर्टलपासून नष्ट केल्यावर सिस्टम प्रोफाइल्स् आता नोंदणी अशक्य केले जातात, जेणेकरून प्रमाणपत्र-आधारित RHN सह तपासणी अशक्य होते.

पसंचीचे सर्व्हिस स्तर
सबस्क्रिप्शन मॅनेजर आता वापरकर्त्यांना मशीनसह पसंतीचे सर्व्हिस लेव्हल जोडण्यास परवानगी देते ज्यामुळे स्वयं-सबस्क्रिप्शन व हिलिंग लॉजिकवर परिणाम होतो. सर्व्हिस लेव्हल्सविषयी अधिक माहितीकरीता, सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट गाइड पहा.

ठराविक किर्कोळ प्रकाशनकरीता सुधारणा मर्यादित करत आहे
सबस्क्रिप्शन मॅनेजर आता वापरकर्त्याला ठराविक प्रकाशन (उदाहरणार्थ, Red Hat Enterprise Linux 5.8) पसंत करण्यास परवानगी देते, जे मशीनला ठराविक प्रकाशनकरीता लॉक करतात. ह्या सुधारणापूर्वी, संकुल सुधारणा मर्यादीत करण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता ज्यामुळे नवीन संकुल पुढील किर्कोळ प्रकाशनचे भाग म्हणून उपलब्ध झाले (उदाहरणार्थ, Red Hat Enterprise Linux 5.9).

GUI मधील युजेबिलिटि बदल
सबस्क्रिप्शन मॅनेजर ग्राफिकल वापरकर्ता संवादला ग्राहक प्रतिसादवर आधारित विविध बदलांसह सुधारित केले आहे.

धडा 6. सुरक्षा व ओळखपटवणे

pam_cracklib करीता अगाऊ पासवर्ड तपासणी
pam_cracklib घटकमध्ये maxclassrepeatgecoscheck पर्यायकरीता Red Hat Enterprise Linux 5.9 बॅकपोर्टेड समर्थन समाविष्ट करतो. ह्या पर्यायचा वापर वापरकर्तातर्फे दिलेल्या नवीन पासवर्डचे गुणधर्म तपासण्यासाठी व निर्देशीत मर्यादा जुळत नसल्यास नकारण्यासाठी केला जातो. maxclassrepeat पर्याय समान कॅरेक्टर क्लासचे (लोवर केस, अप्पर केस, अंक, व इतर अक्षरे) कमाल पाठोपाठ अक्षरांची मर्यादा निश्चित करतो. gecoscheck पर्याय नवीन पासवर्डमधील शब्द वापरकर्त्याच्या पासवर्डकरीता /etc/passwd मधील GECOS क्षेत्रातील शब्द (स्वलपविराम-विभाजीत स्ट्रिंग) प्रमाणे आहे. अधिक माहितीकरीता, pam_cracklib(8) मॅन पृष्ठ पहा.

M2Crypto करीता IPv6 समर्थन
m2crypto संकुल, जे पायथन स्क्रिप्टस् पासून प्रोग्राम्स्ना OpenSSL फंक्शन्स् चालवण्यास लाइब्ररि पुरवते, यास दोंही IPv4 व IPv6 सह कार्य करण्यासाठी HTTPS लागूकरण संपादित करण्याकरीता सुधारित केले आहे. या व्यतिरिक्त, M2Crypto.SSL.Connection ऑब्जेक्टला आता IPv6 सॉकेट्स् निर्माण करण्यासाठी सूचीत करणे शक्य आहे.

sudoers नोंदणीच्या लूकअप्समध्ये जोडींना अधिकृतपणे घोषीत करतो
sudo युटिलिटि sudoers नोंदणी व फाइल्स् किंवा LDAP मध्ये लूकअप करण्यासाठी /etc/nsswitch.conf फाइलशी संपर्क करते. पूर्वी, sudoers नोंदणीच्या डाटाबेसमध्ये जोड आढळल्यास, लूकअप कार्य इतर डाटाबेस (फाल्स् समाविष्टीत) मध्ये सुरू होते. Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये, /etc/nsswitch.conf फाइलमध्ये पर्याय समाविष्ट केले होते जे वापरकर्त्यांना डाटाबेस निर्देशीत करण्यास परवानगी देते ज्यानंतर sudoers नोंदणीचे जोड पुरेसे आहे. यामुळे इतर डाटाबेसची चौकशी करणे अनावश्यक ठरते; ज्यामुळे, मोठ्या वातावरणात नोंदणी लूपअपस्ची कार्यक्षमता वाढते. हे वर्तन पूर्वनिर्धारितपणे सुरू केले जात नाही व नीवडलेल्या डाटाबेसनंतर [SUCCESS=return] स्ट्रिंग समाविष्ट करून संरचीत करणे आवश्यक आहे. ह्या स्ट्रिंगच्या पहिले डाटाबेसमध्ये जोड आढळल्यास, इतर डाटाबेसची चौकशी केली जात नाही.

धडा 7. कंपाइलर व साधने

सिस्टमटॅप
सिस्टमटॅप हे ट्रेसिंग व प्रोबिंग साधन आहे जे वापरकर्त्यांना कार्य प्रणालीचा अभ्यास व क्रिया नियंत्रीत करण्यासाठी तपशीलमध्ये सोय पुरवतो (विशेषतया, कर्नल). netstat, ps, top, व iostat साधनांच्या आऊटपुट प्रमाणेच माहिती पुरवली जाते; तरी, सिस्टमटॅपची रचना अधिक फिल्टरिंग व गोळा केलेल्या माहितीकरीता विश्लेषण पर्याय पुरवण्यासाठी केली आहे.

Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये सिस्टमटॅपला आवृत्ती 1.8 करीता सुधारित केले आहे, जे खालील गुणधर्म व सुधारणा पुरवते:
  • स्क्रिप्ट्स् पासून कमी-थ्रुपुट आउटपुट आउटपुटचे पोल करण्याकरीता, सिस्टमटॅप रनटाइम (staprun) आता कमी वारंवार वेकअप्स् स्वीकारण्यासाठी -T वेळसमाप्ति पर्याय स्वीकारते.
  • सिस्टमटॅपतर्फे सक्रिय केल्यास, kbuild $PATH वातावरण आता सॅनिटाइज केले जाते.
  • विना-छपाई अक्षरे एस्केप करण्यासाठी printf रूपण आता %#c कंट्रोल बाब वापरण्यास सक्षम आहे.
  • प्रेटि-प्रिंटेड बिट क्षेत्र आता इंटिजर्सचा वापर करते; अक्षरे आता छपाईकरीता एस्केप्ड् रूपणचा वापर करते.
  • सिस्टमटॅप कंपाईल-सर्व्हर व क्लाएंट आता IPv6 नेटवर्कस् करीता समर्थन पुरवते.
  • सिस्टमटॅप मॉड्युल्स् आता लहान आहेत व वेगवानरित्या कंपाइल करतात. मॉड्युलचे डिबगइंफो आता पूर्वनिर्धारितपणे सप्रेस केले जाते.
  • uprobekprobe हँडलर्स् (प्रोसेस, कर्नल, मॉड्युल) मधील DWARF वेरियेबल्सकरीता प्रवेशसाठी, @var मांडणी आता वैकल्पिक भाषा मांडणी आहे.
  • सिस्टमटॅप स्क्रिप्ट ट्रांसलेटर ड्राइव्हर (stap) आता खालील स्रोत मर्यादा पर्याय पुरवते:
    --rlimit-as=NUM
    --rlimit-cpu=NUM
    --rlimit-nproc=NUM
    --rlimit-stack=NUM
    --rlimit-fsize=NUM
    
  • सिस्टमटॅप कंपाइल-सर्व्हर आता बहु कंकरेंट जोडणींकरीता समर्थन पुरवते.
  • खालील टॅपसेट फंक्शनचा वापर 1.8 प्रकाशनमध्ये केला जात नाही व 1.9 प्रकाशनपासून काढून टाकले जाईल:
    daddr_to_string()
    
  • टॅपसेटमध्ये समाविष्ट केलेल्या C हेडर्ससह मतभेद टाळण्यासाठी सिस्टमटॅप आता स्थानीय वेरियेबल्स् मँगल करतो.
  • एम्बेडेड-C फंक्शन्समध्ये, THIS->* नोटेशनऐवजी नवीन-ठरवलेल्या मॅक्रो STAP_ARG_* चे वापर करा.

धडा 8. क्लस्टरिंग

IBM iPDU फेंस साधनकरीता समर्थन
IBM iPDU फेंस साधनकरीता Red Hat Enterprise Linux 5.9 समर्थन समाविष्ट करतो. ह्या फेंस साधनविषयी अधिक माहितीकरीता, क्लस्टर प्रशासन पुस्तिका पहा.

DLM हॅश टेबल साइज ट्युनिंग
डिस्ट्रिब्युटेड लॉक मॅनेजर (DLM) आता /etc/sysconfig/cman फाइलपासून DLM हॅश टेबल आकारचे ट्युनिंग स्वीकारतो. खालील घटकांना /etc/sysconfig/cman फाइलमध्ये ठरवणे शक्य आहे:
DLM_LKBTBL_SIZE=<size_of_table>
DLM_RSBTBL_SIZE=<size_of_table>
DLM_DIRTBL_SIZE=<size_of_table>

जे, उलट, खालील फाइलमधील मूल्य संपादित करतो:
/sys/kernel/config/dlm/cluster/lkbtbl_size
/sys/kernel/config/dlm/cluster/rsbtbl_size
/sys/kernel/config/dlm/cluster/dirtbl_size

धडा 9. वर्च्युअलाइजेशन

समावेष, व गेस्ट इंस्टॉलेशन समर्थनकरीता, Microsoft हायपर-V ड्राइव्हर्स्
इंटिग्रेटेड Red Hat Enterprise Linux अतिथी प्रतिष्ठापन, व Microsoft हायपर-V वरील Red Hat Enterprise Linux 5.9 मधील हायपर-V पॅरा-वर्च्युअलाइज्ड डिव्हाइस सपोर्ट वापरकर्त्यांना Microsoft हायपर-V हाइपरवाइजर्स् वरील Red Hat Enterprise Linux 5.9 यास अतिथी म्हणून चालवण्यास परवागनी देते. खालील हायपर-V ड्राइव्हर्स् व क्लॉक स्रोतला Red Hat Enterprise Linux 5.9 सह शिप केलेल्या कर्नलमध्ये समाविष्ट केले आहे:
  • नेटवर्क ड्राइव्हर (hv_netvsc)
  • स्टोरेज ड्राइव्हर (hv_storvsc)
  • HID-सहत्व माउस ड्राइव्हर (hid_hyperv)
  • VMbus ड्राइव्हर (hv_vmbus)
  • util ड्राइव्हर (hv_util)
  • क्लॉक स्रोत (i386: hyperv_clocksource, AMD64/Intel 64: HYPER-V टाइमर)

Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये गेस्ट हायपर-V कि-वॅल्यु जोड (KVP) डिमन (hypervkvpd) समाविष्टीत आहे जे यजमानकरीता VMbus तर्फे मूळ माहिती, जसे कि अतिथी IP, FQDN, OS नाव, व OS प्रकाशन क्रमांक पुरवते.

धडा 10. सामान्य सुधारणा

samba3x संकुल सुधारित केले
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये रिबेस्ड् samba3x संकुल समाविष्टीत आहे ज्यामुळे अनेक बग निवारण व सुधारणा प्रस्तुत होतात, ज्यापैकी महत्वाचे यास SMB2 प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केले जाते. /etc/samba/smb.conf फाइलच्या [global] विभागात SMB2 समर्थन खालील घटकासह सुरू केले जाते:
max protocol = SMB2

सावधानता

सुधारित samba3x संकुल ID मॅपिंगचे पद्धती बदलते. वापरकर्त्यांना सध्याची साम्बा संरचना फाइल्स् संपादित करण्यासाठी सूची केले जाते. अधिक माहितीकरीता, साम्बा 3.6.0 करीता प्रकाशन टिप पहा.

OpenJDK 7
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये OpenJDK 6 करीता विकल्प म्हणून OpenJDK 7 करीता पूर्ण समर्थन समाविष्टीत आहे. java-1.7.0-openjdk संकुले OpenJDK 7 जावा रंटाइम एंवार्यंमेट व OpenJDK 7 जावा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट पुरवते. OpenJDK 7 मध्ये JVM वर चालणाऱ्या डायनॅमिकलि टाइप्ड् भाषांकरीता, क्लास लोडर सुधारणा, Unicode 6.0 करीता समर्थन, व सुधारित I/O व नेटवर्किंग APIs करीता एक्सटेंशन्स् समाविष्टीत आहे. Red Hat Enterprise Linux 6 मध्ये देखील OpenJDK 7 समाविष्टीत आहे.

नवीन जावा 7 संकुले
java-1.7.0-ibmjava-1.7.0-oracle संकुल आता Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये उपलब्ध आहे.

नवीन libitm संकुल
libitm मध्ये GNU ट्रांजॅक्शनल मेमरि लाइब्ररि समाविष्टीत आहे, जे विविध थ्रेड्स्तर्फे शेअर्ड मेमरिकरीता प्रवेशकरीता सिंक्रोनाइजेशन सुरू करण्यासाठी मेमरिच्या प्रवेशकरीता ट्रांजॅक्शन समर्थन पुरवते.

Rsyslog ला मुख्य आवृत्ती 5 करीता सुधारीत केले
Red Hat Enterprise Linux 5.9 मध्ये नवीन rsyslog5 संकुल समाविष्टीत आहे जे rsyslog यास मुख्य आवृत्ती 5 करीता सुधारित करते.

महत्तावचे

rsyslog5 संकुल अस्तित्वातील rsyslog संकुलचे अनुकल्प आहे जे Red Hat Enterprise Linux 5 मध्ये rsyslog ची मुख्य आवृत्ती 3 पुरवते. rsyslog5 संकुल प्रतिष्ठापीत करण्यासाठी, rsyslog संकुल पहिले प्रतिष्ठापन अशक्य करणे आवश्यक आहे.

rsyslog संकुलला मुख्य आवृत्ती 5 करीता सुधारीत केल्यामुळे विविध सुधारणा व अनेक बग्स्चे निवारण झाले आहे. खालील सर्वात महत्वाचे बदल आहे:
  • $HUPisRestart डिरेक्टिव्हला काढून टाकले आहे व यापुढे समर्थीत नाही. रिस्टार्ट-प्रकार HUP प्रोसेसिंग त्यामुळे यापुढे उपलब्ध राहत नाही. तरी, SIGHUP सिग्नल प्राप्त झाल्यावर, आउटपुटस्ला (बहुतांश घटनामध्ये लॉग फाइल्स्) फक्त लॉग रोटेशनला समर्थन पुरवण्यासाठी पुनःउघडले जाते.
  • स्पूल फाइल्स्चे रूपण (उदाहरणार्थ, डिस्क-असिस्टेड क्यउज्) बदलले आहे. नवीन रूपणचा वापर करण्यासाठी, स्पूल फाइल्स् ड्रैन करा, उदाहरणार्थ, rsyslogd बंद करून. त्यानंतर, Rsyslog सुधारणासह पुढे चला, व rsyslogd पुनःसुरू करा. एकदाचे सुधारीत केल्यानंतर, नवीन रूपण स्वयंरित्या वापरले जाते.
  • rsyslogd डिमन डिबग मोडमध्ये सुरू असतेवेळी (-d पर्यायचा वापर करून), ते अग्रभूमीत सुरू झाले. याचे निवारन झाले आहे व डिमनला आत्ता फोर्क केले आहे व त्याला पार्श्वभूमीत चालवले जाते, अपेक्षाप्रमाणे. लक्षात ठेवा -n पर्यायचा वापर rsyslogd यास स्वयंरित्या पार्श्वभूमीत सुरू करण्यापासून ठाळण्याकरीता केला जातो.

Rsyslog च्या या आवृत्तीमधील प्रस्तुत केलेल्या बदलांविषयी अधिक माहितीकरीता, http://www.rsyslog.com/doc/v5compatibility.html पहा.

आवृत्ती इतिहास

आवृत्ती हतिहास
आवृत्ती 1-0.2.3Tue Dec 11 2012Sandeep Shedmake
Updated the build for RHEL5.9 Release Notes in Marathi Language
आवृत्ती 1-0.2.2Tue Dec 11 2012Sandeep Shedmake
Initial build of RHEL5.9 Release Notes in Marathi Language
आवृत्ती 1-0.2.1Tue Dec 11 2012Chester Cheng
Translation files synchronised with XML sources 1-0.2
आवृत्ती 1-0.2Tue Dec 11 2012Martin Prpič
Release of the Red Hat Enterprise Linux 5.9 Release Notes
आवृत्ती 1-0.1Mon Sep 24 2012Martin Prpič
Translation files synchronised with XML sources 1-0
आवृत्ती 1-0Thu Sep 20 2012Martin Prpič
Release of the Red Hat Enterprise Linux 5.9 Beta Release Notes