The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.
प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व विस्तारांची उच्च स्तरीय माहिती पुरवतो. 6.4 सुधारणाकरीता Red Hat Enterprise Linux मध्ये लागू केलेल्या सर्व बदलांविषयी तपशील दस्तऐवजीकरणासाठी, टेक्निकल नोट्स पहा.
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 6.4 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणाली व या किर्कोळ प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ॲप्लिकेशन्सकरीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करतो. सर्व बदलांकरीता (म्हणजेच, निवारण झालेले बग्स्, समाविष्ट सुधारणा, व आढळलेल्या परिचीत अडचणी) तपशील टिपा किर्कोळ प्रकाशनात टेक्निकल नोट्स येथे उपलब्ध आहेत. टेकनिकल नोट्स दस्तऐवजात सर्व उपलब्ध टेक्नॉलजि प्रिव्युऊची सूची देखील समाविष्टीत आहे.
महत्वाचे
ऑनलाइन Red Hat Enterprise Linux 6.4 प्रकाशन टिपा, जे ऑनलाइनरित्या येथे उपलब्ध आहे, यास प्रशस्त, अप्टूडेट आवृत्ती समझले जाते. Red Hat Enterprise Linux च्या प्रकाशनविषयी प्रश्नांकरीता ऑनलाइन रिलिज व टेक्निकल नोट्स पहा.
Red Hat Enterprise Linux 6.4 इंस्टॉल करण्यासाठी किकस्टार्ट फाइलचा वापर करताना, नवीन fcoe किकस्टार्ट पर्यायसह फाइबर चॅनल ओव्हर इथरनेट (FCoE) साधने स्वयंरित्या सुरू व्हायला हवे, एंहांस्ड डिस्क ड्राइव्ह (EDD) सर्व्हिसेसतर्फे आढळण्याव्यतिरिक्त. अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 6 इनस्टॉलेशन गाइड मधील किकस्टार्ट पर्याय विभाग पहा.
VLAN वरील इनस्टॉलेशन
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, vlanid= बूट पर्याय व --vlanid= किकस्टार्ट पर्याय तुम्हाला ठराविक नेटवर्क साधनकरीता वर्च्युअल LAN ID (802.1q टॅग) निश्चित करण्यास परवानगी देते. यापैकी एक पर्याय निर्देशीत केल्याने, प्रणालीचे इनस्टॉलेशन VLAN वरील शक्य आहे.
बाँडिंग संरचीत करत आहे
bond बूट पर्याय व --bondslaves व --bondopts किकस्टार्ट पर्यायचा वापर आता बाँडिंग इनस्टॉलेशन प्रक्रियेचा भाग म्हणून संरचीत करण्यासाठी शक्य आहे. बाँडिंग संरचीत करण्याविषयी अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 6 इनस्टॉलेशन गाइड: विभाग किकस्टार्ट पर्याय व धडा बूट पर्याय पहा.
एंड-टू-एंड (E2E) डाटा कंसिस्टंसि तपासणीकरीता सुधारीत T10 DIF SCSI मानकाचे zFCP-निर्देशीत भाग लागू करून, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये यजमान अडॅप्टर व स्टोरेज सर्व्हर अंतर्गत डाटा एकाग्रता सुधारीत केली आहे.
आय.बि.एम. सिस्टम झिकरीता फ्लॅश एक्सप्रेस समर्थन
आय.बि.एम. सिस्टम झिकरीता स्टोरेज-क्लास मेमरि (SCM) डाटा स्टोरेजचे क्लास आहे जे दोंही स्टोरेज व मेमरिचे गुणविशेष एकत्रीत करते. सिस्टम झिकरीता SCM आता फ्लॅश एक्सप्रेस मेमरिकरीता समर्थन पुरवते. एक्सटेंडेड एसिंक्रोनस डाटा मोवर (EADM) उपवाहिनींतर्फे SCM वाढकरीता प्रवेश शक्य आहे. प्रत्येक वाढ ब्लॉक साधनतर्फे प्रस्तुत केले जाते. हे गुणविशेष तात्पुरते स्टोरेजकरीता पेजिंट रेट व ॲक्सेस परफार्मंस सुधारते, उदाहरणार्थ डाटा वेअरहाउजिंगकरीता.
ओपन विस्विच कर्नन मॉड्युल
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये ओपन विस्विच कर्नल मॉड्युल Red Hatच्या स्थरीय उत्पादन ऑफरिंगकरीता एनेबलर म्हणून समाविष्टीत आहे. ओपन विस्विच फक्त वापरकर्ताजोगी स्पेस युटिलिटिज समाविष्टीत असणाऱ्या उत्पादनांकरीताच समर्थन पुरवते. कृपया लक्षात ठेवा आवश्यक वापरकर्ता निर्देशीत युटिलिटिजविना, ओपन विस्विच कार्य करणार नाही व वापरकरीता सुरू करणे अशक्य आहे. अधिक माहितीकरीता, कृपया खालील क्नॉलेज बेस आर्टिकल पहा: https://access.redhat.com/knowledge/articles/270223.
बूट झालेली प्रणाली व डम्प केलेल्या प्रणालीमधील भेद
हे गुणविशेष बूट झालेल्या प्रणालीला डम्पड् प्रणालीसह वेगळे करण्यास परवानगी देते व प्रतिमा स्थानांतरतर्फे प्रस्तुत बदलांचे विश्लेषणकरीता परवानगी देते. अतिथीला ओळखण्यासाठी, stsi व stfle डाटाचा वापर केला जातो. नवीन फंक्शन, lgr_info_log() सध्याच्या डाटाला (lgr_info_cur) शेवटच्यावेळी रेकॉर्ड केलेल्या डाटाशी (lgr_info_last) तुलना करतो.
पेर्फ साधन सुधारीत केले
पेर्फ साधनाला अपस्ट्रिम आवृत्ती 3.6-rc7 करीता सुधारीत केले आहे, जे असंख्या बग निवारन व सुधारणा पुरवतात. खालील लक्षणीय सुधारणांची सूची आहे:
केप्रोब इव्हेंट समर्थन समाविष्ट केले.
नवीन पेर्फ इव्हेंट कमांडलाइन सिंटॅक्स इंजिन समाविष्ट केले आहे, जे कर्लि ब्रॅकेट्सचा ({ व }) वापर इव्हेंट ग्रूप्सच्या वर्णनकरीता होतो, उदारणार्थ: {cycles,cache-misses}.
ASM कॉल्स व जम्प्सतर्फे संचारन स्वीकारण्यासाठी पेर्फ अनॉटेट ब्राउजरला सुधारीत केले आहे.
पेर्फ साधनाला, नवीन --uid आदेश ओळ पर्यायसह प्रत्येक-वापरकर्ता अवलोकन पुरवण्यासाठी सुधारीत केले आहे. वापरल्यास, पेर्फ फक्त ठराविक वापरकर्त्यासाठी कार्ये दाखवतो.
पेर्फ साधन आता विविध प्रकारचे स्वयंचलित चाचणी पुरवतो.
अनकोर पि.एम.यु. सपोर्ट
Red Hat Enterprise Linux 6.4 सह शिप केलेले कर्नल इंटेल झिऑन प्रोसेसर X55xx व इंटेल झिऑन प्रोसेसर X56xx फॅमिलि ऑफ प्रोसेसर्सकरीता perf इव्हेंट सबसिस्टमसाठी "uncore" परफॉर्मंस मॉनिटरिंग युनिट (PMU) समर्थन पुरवते . "uncore" म्हणजे फिजिकल प्रोसेसर संकुलमधील उपप्रणाली ज्यास एकापेक्षाजास्त प्रोसेसर कोर्सतर्फे शेअर केले जाते, उदाहरणार्थ L3 कॅशे. uncore PMU समर्थनसह, परफॉर्मंस डाटाला संकुल स्तरावर संग्रहीत करणे शक्य आहे.
perf तर्फे डिबगिंग स्वीकारण्यासाठी PMU इव्हेंट्स पार्सिंग देखील सुरू केले आहे.
कमी memcg मेमरि ओवरहेड
मेमरि कंट्रोल गट स्वतःचे लिस्ट रिसेंटलि युज्ड (LRU) सूची व्यवस्थीपत करते, उदाहरणार्थ, रिक्लेम मेमरि. हि सूची ग्लोबल पर-झोन LRU सूचीच्या वर आहे. Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, memcg करीता पर-झोन LRU सूची बंद करून मेमरि ओव्हरहेडला कमी करण्यात आहे व त्याऐवजी वापरकर्त्यांना पर-मेमरि cgroup सूचीवर कार्य करण्यास रूपांतरीत केले आहे.
मेमरि रिक्लेम व कॉम्पॅक्शन
हाय-आर्डर अलॉकेशन विनंतीकरीता किंवा अंडर मेमरि प्रेशरकरीता Red Hat Enterprise Linux 6.4 सह शिप केलेले कर्नल रिक्लेम व कॉम्पॅक्शनचा वापर करते.
ट्रांजॅक्शनल एक्जिक्युशन फॅसिलिटि व रंटाइम इंस्ट्रुमेंटेशन फॅसिलिटिचे समर्थन
लिनक्स कर्नलमधील ट्रांजॅक्शनल-एक्जिक्युशन फॅसिलिटिचे समर्थन (IBM zEnterprise EC12 सह उपलब्ध) सॉफ्टवेअर लॉकिंग ओव्हरहेड बंद करण्यास मदत करते ज्याचा प्रभाव जास्त ट्रांजॅक्शन थ्रुपुटच्या परफॉर्मंस व वाढीव स्केलेबिलिटि पुरवण्यावर पडते. नवीन IBM JVM तर्फे निर्मीत कोडचे सुधारित विश्लेषण व ऑप्टिमाइजेशनकरीता रनटाइम इंस्ट्रुमेंटेशन फॅसिलिटिचे समर्थन (IBM zEnterprise EC12 सह उपलब्ध) प्रगत पद्धती पुरवतात.
फेल-ओपन मोड
नेटफिल्टरच्या NFQUEUE लक्ष्यचा वापर करतेवेळी, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये नवीन फेल-ओपन मोडकरीता समर्थन समाविष्ट केले आहे. हे मोड वापरकर्त्याला तात्पुरतेरित्या पॅकेट इंस्पेक्शन बंद करण्यास व जास्त नेटवर्क ट्रॉफिकवेळी जोडणी सुरू ठेवण्यास मदत करते.
आय.बि.एम. सिस्टम झि फुल्लि सपोर्टेडकरीता kdump व kexec कर्नल डम्पिंग पद्धती
Red Hat Enterprise Linux 64 मध्ये, kdump/kexec कर्नल डम्पिंग पद्धती IBM सिस्टम z प्रणालींकरीता संपूर्णतया समर्थीत गुणविशेष म्हणून सुरू केले आहे, IBM सिस्टम z स्टँड-अलोन व हायपरवाइजर डम्पिंग पद्धतीच्या व्यतिरीक्त. ऑटो-रिजर्व्ह थ्रेशहोल्ड 4 Gb करीता सेट केले आहे; म्हणून, 4 Gb पेक्षा जास्त मेमरीसह कोणत्याहि IBM सिस्टम z प्रणालीसाठी kdump/kexec पद्धती उपलब्ध आहे.
kdump कडे अंदाजे 128 MB पूर्वनिर्धारितपणे आरक्षित असल्यामुळे पुरेशी मेमरि उपलब्ध पाहिजे. Red Hat Enterprise Linux 6.4 करीता सुधारमा करतेवेळी हे विशेषतया महत्वाचे आहे. प्रणाली क्रॅशमध्ये डम्प साठवण्याकरीता अतिरिक्त डिस्क जागा देखील उपलब्ध पाहिजे.
/etc/kdump.conf, system-config-kdump, किंवा firstboot तर्फे kdump ला सुरू किंवा बंद करणे शक्य आहे.
KVM करीता TSC डेडलाइन समर्थन
स्थानीय APIC (LAPIC) टाइमरमध्ये TSC डेडलाइन टाइमर नवीन मोड आहे, जे TSC डेडलाइनवर आधारित वन-शॉट टाइमर इंटररप्ट्स निर्माण करते, सध्याच्या APIC क्लॉक काउंट अवधीवर आधारित. OS शेड्युलरला फायदा पोहचवण्याकरीता हुबेहुह टाइमर इंटररप्टस (1 टिकपेक्षा कमी) पुरवले जातात. KVM आता या गुणविशेषला अतिथींकरीता पोहचवतो.
पर्सिस्टंट साधनाचे नामांकन
हे गुणविशेष डिव्हाइस नावचे मॅपिंग (उदाहरणार्थ, sda, sdb, व इतर) व कर्नल संदेशकरीता पर्सिस्टंट डिव्हाइस नाव (/dev/disk/by-*/ मध्ये udev तर्फे पुरवलेले) साठवते. यामुळे वापरकर्ते कर्नल संदेशपासून साधन ओळखू शकतात. कर्नल /dev/kmsg लॉग, ज्यास dmesg आदेशसह दाखवणे शक्य आहे, आता सिम्बॉलिक लिंक्सकरीता संदेश दाखवते, ज्या कर्नल साधनांकरीता udev निर्माण केले आहे. हे संदेश खालील स्वरूपात दाखवले जातात:
कोणतेहि लॉग ॲनलाइजर या संदेशना दाखवू शकतात, ज्यास /var/log/messages मध्ये syslog तर्फे साठवले जाते.
नवीन linuxptp संकुल
linuxptp संकुल, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केलेले, लिनक्सकरीता IEEE मानक 1588 नुसार प्रिसिशन टाइम प्रोटोकॉल (PTP) चे लागूकरण आहे. दुहेरी डिजाइन गोल्स मानकाचे लागूकरण व लिनक्स कर्नलतर्फे पुरवलेले ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेस (API) पुरवतात. लेगसि APIs व इतर प्लॅटफॉर्म्सकरीता समर्थन पुरवणे लक्ष्य नाही.
ट्रांस्परेंट ह्युजपेजेस दस्तऐवजीकरण
ट्रांस्परेंट ह्युजपेजेसकरीता दस्तऐवजीकरण खालील फाइलकरीता पुरवले आहे:
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, the /usr/share/doc/kexec-tools-2.0.0/kexec-kdump-howto.txt फाइल “डम्प टार्गेट सपोर्ट स्टेटस” अंतर्गत समर्थीत, असमर्थीत, व अपरिचीत डम्प टार्गेट्स्ची सूची पुरवतो.
Chapter 3. डिव्हाइस ड्राइव्हर्स
स्टोरेज ड्राइव्हर्स
डाइरेक्ट ॲक्सेस स्टोरेज साधन (DASD) डिव्हाइस ड्राइव्हरला पाथ संरचना त्रुटी ओळखण्यास सुधारित केले आहे ज्यास हार्डवेअर किंवा माइक्रोडतर्फे शोधणे अशक्य आहे. यशस्वीरित्या ओळखल्यानंतर, डिव्हाइस ड्राइव्हर या प्रकारच्या पाथचा वापर करत नाही. या गुणविशेषसह, उदाहरणार्थ, DASD डिव्हाइस ड्राइव्हर ठराविक उपवाहिनीकरीता लागू केलेले मार्ग ओळखते परंतु वेगळ्या स्टोरेज सर्वर्सकरीता निर्देशीत होते.
सिस्टम झि फाइबर चॅनल प्रोटोकॉल (FCP) अडॅप्टर कार्डकरीता सुधारित मोड समर्थन पुरवण्यासाठी zfcp डिव्हाइस ड्राइव्हरला डाटा स्ट्रक्चर्स समाविष्ट करण्यास व त्रुटी हाताळण्यास सुधारित केले आहे. या मोडमध्ये, अडॅप्टर मेमरिपासून ते SAN (डाटा राउटिंग) करीता प्रत्यक्षरित्या डाटा पुरवतो जेव्हा अडॅप्टर कार्डवरील मेमरि मोठे व लहान I/O विनंतीतर्फे ब्लॉक केले जातात.
पिसिआयइ एसएसडि ड्राइव्हसकरीता समर्थन समाविष्ट करण्यासाठी mtip32xx ड्राइव्हर सुधारित केले आहे.
एम्युलेक्स् फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्सकरीता lpfc ड्राइव्हरला आवृत्ती 8.3.5.82.1p करीता सुधारित केले आहे.
क्युलॉजिक फाइबर चॅनल एचबिएजकरीता qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.04.00.04.06.4-k करीता सुधारित केले आहे, जे क्युलॉजिकच्या 83XX कंवर्ज्ड नेटवर्क अडॅप्टर (CNA) करीता, क्युलॉजिक अडॅप्टर्सकरीता 16 GBps एफसि सरमर्थन पुरवतो, व HP प्रोलायंट सर्व्हर्सकरीता नवीन फॉर्म फॅक्टर CNA पुरवतो.
qla4xxxx ड्राइव्हरला आवृत्ती v5.03.00.00.06.04-k0 करीता सुधारित केले आहे, जे change_queue_depth API समर्थन पुरवते, अनेक बगचे निवारन करते, व विविध सुधारणा प्रस्तुत करते.
ql2400-firmware फर्मवेअर क्युलॉजिक 4जिबिपिएस फाइबर चॅनल एचबिएला आवृत्ती 5.08.00 करीता सुधारित केले आहे.
क्युलॉजिक 4जिबिपिएस फाइबर चॅनल एचबिएकरीता ql2500-firmware फर्मवेअरला आवृत्ती 5.08.00 करीता सुधारित केले आहे.
आय.बि.एम. पावर लिनक्स RAID SCSI HBAs करीता ipr ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.4 करीता सुधारित केले आहे, Power7 6Gb SAS अडॅप्टर्सकरीता समर्थन पुरवते व या अडॅप्टर्सकरीता SAS VRAID क्षमता पुरवते.
HP स्मार्ट अरे जनरेशन 8 फॅमिलि ऑफ कंट्रोलर्सकरीता PCI-IDs समाविष्ट करण्यासाठी hpsa ड्राइव्हरला आवृत्ती 2.0.2-4-RH1 करीता सुधारित केले आहे.
ब्रॉडकॉम नेटएक्सट्रिम II iSCSI करीता सर्वसाधारण हार्डवेअर समर्थन सुधारणांसह, bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.2.2 करीता सुधारीत केले आहे.
ब्रॉडकॉम साधनवरील iSCSI व FCoE बूट समर्थन आता Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये पूर्णतया समर्थीत आहे. हे दोन गुणविशेष bnx2i व bnx2fc ब्रॉडकॉम ड्राइव्हर्सतर्फे पुरवले जातात.
ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II 57712 चिपकरीता bnx2fc ड्राइव्हरला आवृत्ती 1.0.12 करीता सुधारित केले आहे.
ब्रॉडकॉम साधनवरील iSCSI व FCoE बूट समर्थन आता Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये पूर्णतया समर्थीत आहे. हे दोन गुणविशेष bnx2i व bnx2fc ब्रॉडकॉम ड्राइव्हर्सतर्फे पुरवले जातात.
mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 13.101.00.00 करीता सुधारित केले आहे, जे लिनक्स बिएसजि ड्राइव्हरकरीता बहु-सेममेंट मोड समर्थन पुरवते.
ब्रोकेड bfa फाइबर चॅनल व FCoE ड्राइव्हरला आवृत्ती 3.0.23.0 करीता सुधारित केले आहे ज्यामध्ये ब्रोकेड 1860 16Gbps फाइबर चॅनल अडॅप्टर समर्थन समाविष्टीत आहे, नवीन हार्डवेअर समर्थन डेल पावरएड्ज 12th जनरेशन सर्व्हर्स, व issue_lip समर्थन समाविष्टीत आहे. bfa फर्मवेअरला आवृत्ती 3.0.3.1 करीता सुधारित केले.
iSCSI नेटलिंक VLAN समर्थन समाविष्ट करण्यासाठी be2iscsi ड्राइव्हरला ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI साधन आवृत्ती 4.4.58.0r करीता सुधारित केले आहे.
qib ड्राइव्हरला TrueScale HCAs करीता, खालील सुधारणांसह सर्वात नवीन आवृत्तीसह सुधारित केले आहे:
खालील ड्राइव्हर्स यास सर्वात नवीन अपस्ट्रिम गुणविशेष व बग निवारन समाविष्ट करण्यास सुधारित केले आहे: ahci, md/bitmap, raid0, raid1, raid10, व raid456.
नेटवर्क ड्राइव्हर्स
नेटएक्सेन मल्टि पोर्ट (1/10) गिगाबिट नेटवर्ककरीता netxen_nic ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.80 करीता सुधारित केले आहे, जे miniDIMM समर्थन समाविष्ट करते. netxen_nic फर्मवेअरला आवृत्ती 4.0.588 करीता सुधारित केले आहे.
bnx2x ड्राइव्हरला ब्रॉडकॉम 57800/57810/57811/57840 चिप्सकरीता समर्थन समाविष्ट करण्यासाठी तसेच Broadcom 57710/57711/57712 चिप्सकरीता सर्वसाधारन बग निवारन व सुधारित फर्मवेअर समर्थन पुरवण्यासाठी आवृत्ती 1.72.51-0 करीता सुधारित केले आहे. यामध्ये खालील सुधारणा देखील समाविष्टीत आहे:
ब्रॉडकॉम 57712/578xx चिप्सवरील iSCSI ऑफलोड व डाटा सेंटर ब्रिजिंग/फाइबर चॅनल ओवर इथरनेट (DCB/FCOE) करीता समर्थन. फक्त 4x10G संरचनामध्येच ब्रॉडकॉम 57840 चिपला समर्थन पुरवले जाते व iSCSI ऑफलोड व FCoE करीता समर्थन पुरवत नाही. भविष्यातील प्रकाशने अगाऊ संरचना व iSCSI ऑफलोड व FCoE करीता समर्थन पुरवेल.
सर्व्हरइंजिन्स् ब्लेडइंजिन2 10जिबिपिएस नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हरला RDMA ओवर कंवर्ज्ड इथरनेट (RoCE) समर्थन समाविष्ट करण्यासाठी आवृत्ती 44310r करीता सुधारित केले आहे.
या व्यतिरिक्त, एम्युलेक्स be2net ड्राइव्हरची SR-IOV कार्यक्षमता आता Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये पूर्णतया समर्थीत आहे. SR-IOV सर्व एम्युलेक्स-ब्रँडेड व BE3-आधारीत हार्डवेअरच्या OEM वेरियंटस् वर कार्य करतो, ज्यास be2net ड्राइव्हर सॉफ्टवेअर आवश्यक आहे.
सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारन समाविष्ट करण्यासाठी ixgbevf ड्राइव्हरला आवृत्ती 2.6.0-k करीता सुधारित केले आहे.
चेलसिओ टर्मिनेटर4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्सकरीता cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे चेलसिओ T480-CR व T440-LP-CR अडॅप्टर्सकरीता समर्थन पुरवते.
नेटवर्क साधनांकरीता चेलसिओ T3 फॅमिलिच्या cxgb3 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्ती 1.1.5-ko करीता सुधारित केले आहे.
इंटेल 10 गिगाबिट PCI एक्सप्रेस नेटवर्क साधनांनाकरीता ixgbe ड्राइव्हरला SR-IOV करीता डाटा सेंटर ब्रिजिंग (DCB) किंवा रिसिव्ह-साइड स्केलिंग (RSS), PTP समर्थनला टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट करण्यास, सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन, सुधारणा, व बग निवारनकरीता, आवृत्ती 3.9.15-k करीता सुधारीत केले आहे.
iw_cxgb3 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
iw_cxgb4 ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन, गुणविशेष, व बग निवारनसाठी, इंटेल PRO/1000 नेटवर्क साधनांकरीता e1000e ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
सिस्को 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.39 करीता सुधारित केले आहे.
igbvf ड्राइव्हरला (इंटेल गिगाबिट वर्च्युअल फंक्शन नेटवर्क ड्राइव्हर) सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारीत केले आहे.
इंटेल गिगाबिट इथरनेट अडॅप्टर्सकरीता सर्वात नवीन हार्डवेअर समर्थन समाविष्ट करण्यासाठी igb ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.1 करीता सुधारित केले आहे. तरी, PTP समर्थनला igb ड्राइव्हरकरीता टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे.
नवीन हार्डवेअर समर्थनकरीता समाविष्ट करण्यासाठी ब्रॉडकॉम टिगॉन3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.124 करीता सुधारित केले आहे. तसेच, PTP समर्थनला tg3 ड्राइव्हरकरीता टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे.
एचपि एनसि-सिरिज क्युलॉजिक 10 गिगाबिट सर्व्हर अडॅप्टर्सकरीता qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.29 करीता सुधारित केले आहे.
Dell पावरएड्ज 12th जनरेशन सर्वर्सकरीता नवीन हार्डवेअर समर्थन समाविष्ट करण्यासाठी, व विना-ब्रॉकेड ट्विनॅक्स कॉपर केबल्सचा वापर सुरू करण्यासाठी, ब्रॉकेड bna ड्राइव्हरला ब्रॉकेड 10Gb PCIe इथरनेट कंट्रोलर्स ड्राइव्हरकरीता, आवृत्ती 3.0.23.0 साठी सुधारित केले आहे. bna फर्मवेअरला आवृत्ती 3.0.3.1 करीता सुधारित केले आहे.
नवीन गुणविशेष, बग निवारन, व नवीन OEM प्लॅटफॉर्म्सकरीता समर्थन पुरवण्यासाठी, ब्रॉडकॉम नेटएक्सस्ट्रिम II bnx2fc ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.13 करीता सुधारीत केले आहे.
इतर ड्राइव्हर्स
इंटेलच्या Xeon E5-XXX V2 सिरिजच्या प्रोसेसरकरीता समर्थन पुरवण्यासाठी इंटेल प्रोसेसर्सकरीता intel_idle cpuidle ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
CTL-460 वॅकॉम बॅमबू पेन, द वॅकॉम इंटुओएस5 टॅबलेट, व द वॅकॉम सिंटिक 22HD पेन डिस्पलेकरीता समर्थन पुरवण्यासाठी wacom ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
नवीन हार्डवेअरकरीता समर्थन सुधारित करण्यासाठी व बग्सच्या निवारनकरीता ALSA HDA ऑडिओ ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
mlx4_en ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
mlx4_ib ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
mlx4_core ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
z90crypt डिव्हाइस ड्राइव्हरला नवीन क्रिप्टो एक्सप्रेस 4 (CEX4) अडॅप्टर कार्डकरीता समर्थन पुरवण्यासाठी सुधारित केले आहे.
Chapter 4. नेटवर्किंग
एचएप्रॉक्सी
एचएप्रॉक्सी TCP व HTTP-आधारित ॲप्लिकेशन्सकरीता स्टँडअलोन, लेयर 7, उच्च-कामगिरि नेटवर्क लोड बॅलेंसर आहे जे HTTP विनंतीतील अंतर्भूत माहितीवर आधारीत विविध प्रकारची क्रमवारी सुरू करते. Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये haproxy संकुल टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहे.
Chapter 5. ओळख व इंटरऑपरेबिलिटि
SSSD संपूर्णतया समर्थीत गुणविशेष
Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये प्रस्तुत केले अनेक गुणविशेष आता Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये पूर्णतया समर्थीत आहे. विशेषतया:
SSH किजच्या सेंट्रल व्यवस्थापनकरीता समर्थन,
SELinux युजर मॅपिंग,
automount मॅप कॅशिंगकरीता समर्थन.
नवीन SSSD कॅशे स्टोरेज प्रकार
केर्बेरोज आवृत्ती 1.10 ने नवीन कॅशे स्टोरेज प्रकार समाविष्ट केले आहे, DIR:, जे केर्बेरोजला तिकिट ग्रांटिंग तिकिट्स (TGTs) एकाचवेळी एकापेक्षाजास्त कि डिस्ट्रिब्युशन सेंटर्स (KDCs) व्यवस्थापीत व केर्बेरोस-परिचीत स्रोतसह स्व-पसंत करण्यास परवानगी देते. Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, SSSD तर्फे प्रवेश करणाऱ्या वापरकर्त्यांना DIR: कॅशे पसंत करण्यासाठी SSSD ला सुधारित केले आहे. ह्या गुणविशेषला टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून प्रस्तुत केले आहे.
AD-आधारित ट्रस्टेड डोमेन्सला external गटांकरीता समाविष्ट करत आहे
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, ipa group-add-member आदेश तुम्हाला ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि-आधारित ट्रस्टेड डोमेन्सचे सदस्य आइडेंटिटि मॅनेजमेंटमध्ये external असे चिन्ह असलेल्या गटांकरीता समावेश करण्यास परवानगी देतो. या सदस्यांना डोमेन- किंवा UPN-आधारित मांडणीचा वापर करून नाव निर्देशीत करणे शक्य आहे, उदाहरणार्थ AD\UserName किंवा AD\GroupName, किंवा User@AD.Domain. या फॉर्ममध्ये निर्देशीत केल्यास, सदस्यांना सेक्युरिटि आइडेंटिफायर (SID) मूल्य प्राप्त करण्यासाठी ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि-आधारित डोमेनच्या गोबल कॅटलॉग विरूद्ध निवारन केले जाते.
या व्यतिरिक्त, SID मूल्याला प्रत्यक्षरित्या निर्देशीत करणे शक्य आहे. या बाबित, ipa group-add-member आदेश फक्त SID मूल्याचे डोमेन भाग ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि डोमेन्सचे विश्वासर्ह भाग याची खात्री करते. डोमेन अंतर्गत SID ची वैधता तपासण्याची खात्री केली जात नाही.
बाहेरील सदस्यांना निर्देशीत करण्याऐवजी SID मूल्यांना प्रत्यक्षरित्या पुरवण्यासाठी वापरकर्ता किंवा गट नाव मांडणीचा वापर शिफारसीय आहे.
आइडेंटिटि मॅनेजमेंट सबसिस्टम प्रमाणपत्र स्वतः ताजे करा
नवीन सर्टिफिकेट अथॉरिटिची वैधता कालवधि 10 वर्ष आहे. CA उप्रणालींकरीता (OCSP, ऑडिट लॉग, व इतर) अनेक सर्टिफिकेट्स इश्यु करते. उपप्रणाली सहसा 2 वर्षांकरीता वैध राहते. सर्टिफिकेटची वेळसमाप्ति झाल्यानंतर, CA योग्यरित्या सुरू होत नाही किंवा योग्यरित्या कार्य करत नाही. म्हणूनच, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, आइडेंटिटि मॅनेजमेंट सर्व्हर्स उपप्रणाली सर्टिफिकेटचे पुनरावलोकन करण्यास सक्षम आहे. उपप्रणाली सर्टिफिकेट्स certmonger तर्फे नियंत्रीत राहतात, जे स्वयंरित्या वेळसमाप्तिपूर्वी सर्टिफिकेट्सला पुनःताजे करण्याचा प्रयत्न करते.
आइडेंटिटि मॅनेजमेंटमध्ये एंरोल केलेल्या क्लाएंट्सकरीता OpenLDAP क्लाएंट साधनांची स्वय संरचना
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, आइडेंटिटि व्यवस्थापन क्लाएंट इंस्टॉलेशनवेळी OpenLDAP यास पूर्वनिर्धारितपणे LDAP URI, बेस DN, व TLS सर्टिफिकेटसह संरचीत केले जाते. यामुळे आइडेंटिटि मॅनेजमेंट डिरेक्ट्रि सर्व्हरकरीता LDAP शोध सुरू करतेवेळी, वापरकर्ता अनुभव सुधारित होतो.
python-nss करीता PKCS#12 समर्थन
python-nss संकुल, जे नेटवर्क सेक्युरिटि सर्व्हिसेस (NSS) व नेटस्केप पोर्टेबल रनटाइम (NSPR) करीता पायथन बाइंडिंग्स पुरवते, यास PKCS #12 समर्थन समाविष्ट करण्यास सुधारित केले आहे.
DNS करीता संपूर्ण पर्सिस्टंट शोध
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये दोंही झोन्स व त्यांच्या रिसोअर्स रेकॉर्डस्करीता LDAP पर्सिस्टंट शोधकरीता समर्थन समाविष्ट करतो. पर्सिस्टंट शोधLDAP डाटाबेसमध्ये सर्व बदलांविषयी माहिती पुरवण्यास bind-dyndb-ldap प्लगइनला परवानगी देतो. वारंवार पोलिंगतर्फे आवश्यक नेटवर्क बँडविड्थ वापर देखील कमी होतो.
नवीन CLEANALLRUV ऑपरेशन
डाटाबेस रेप्लिका अप्डेट वेक्टर (RUV) मधील ॲबसोलिट एलिमेंटसना CLEANRUV कार्यसह नष्ट करणे शक्य आहे, जे त्यास सिंगल सप्लायर किंवा मास्टरपासून काढून टाकते. Red Hat Enterprise Linux 6.4 नवीन CLEANALLRUV कार्य समाविष्ट करते जे सर्व रेप्लिकाजपासून ॲबसोलिट RUV डाटा काढू शकते व फक्त सिंगल सप्लायर/मास्टरमध्ये चालवणे आवश्यक आहे.
samba4 लाइब्ररिज सुधारित केले
samba4 लाइब्ररिज (samba4-libs संकुलसह पुरवलेले) यास ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि (AD) डोमेन्ससह इंटरऑपरेबिलिटि सुधारित करण्यासाठी सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे. AD कि डिस्ट्रिब्युशन सेंटर (KDC) तर्फे इश्यु केलेल्या प्रिविलेज ॲट्रिब्युट सर्टिफिकेट (PAC) वाचण्याकरीता SSSD आता libndr-krb5pac लाइब्ररिचा वापर करतो. या व्यतिरिक्त, विंडोज प्रणालीपासून वेरिफिकेशन ऑफ ट्रस्ट स्वीकारण्यासाठी लोकल सेक्युरिटि अथॉरिटि (LSA) व नेट लॉगॉन सर्व्हिसेसकरीता विविध सुधारणा केले आहेत. क्रॉस रिअल्म केर्बेरोज ट्रस्ट फंक्शनालिटिच्या परिचयविषयी अधिक माहितीकरीता, जे samba4 संकुलांवर आधारित आहे, Section 5, “आइडेंटिटि व्यवस्थापनात क्रॉस रिअल्म केर्बेरोज ट्रस्ट फंक्शनॅलिटि” पहा.
Warning
Red Hat Enterprise Linux 6.3 पासून Red Hat Enterprise Linux 6.4 करीता सुधारणा केल्यास व साम्बाचा वापर करत असल्यास, samba4 संकुल अनइंस्टॉल करायची खात्री करा व सुधारणावेळी विरोध टाळा.
क्रॉस रिअल्म केर्बेरोज ट्रस्ट फंक्शनालिटिला टेक्नॉलजि प्रिव्युउ गृहीत केल्यामुळे, नीवडलेले samba4 घटकांना टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून गोषीत केले जाते. कोणते साम्बा संकुलांना टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून घोषीत करायचे, त्याविषयी अधिक माहितीकरीता, Table 5.1, “साम्बा4 संकुल समर्थन” पहा.
संकुल नाव
6.4 मध्ये नवीन संकुल?
सपोर्ट स्थिती
samba4-libs
नाही
टेकनॉलजि प्रिव्युउ, ओपनचेंजतर्फे आवश्यक कामगिरि वगळता
samba4-pidl
नाही
टेकनॉलजि प्रिव्युउ, ओपनचेंजतर्फे आवश्यक कामगिरि वगळता
आइडेंटिटि मॅनेजमेंटतर्फे पुरवलेले क्रॉस रिअल्म केर्बेरोज ट्रस्ट फंक्शनालिटिला टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे. हे गुणविशेष आइडेंटिटि मॅनेजमेंट व ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि डोमेन अंतर्गत संबंध निर्माण करण्यास परवानगी देते. याचा अर्थ AD डोमेन पासूनचे वापरकर्ते आइडेंटिटि मॅनेजमेंटपासून AD श्रेयसह रिसोअर्सेस व सर्व्हिसेसकरीता प्रवेश प्राप्त करू शकतात. आइडेंटिटि मॅनेजमेंट व AD डोमेन कंट्रोलर्स अंतर्गत डाटाची समजुळणी आवश्यक नाही; AD वापरकर्त्याची नेहमी AD डोमेन कंट्रोलर विरुद्ध ओळख पटवली जाते व समजुळणीच्या आवश्यकताविना वापरकर्ताविषयी माहिती शोधली जाते.
हे गुणविशेष वैकल्पिक ipa-server-trust-ad संकुलतर्फे पुरवले आहे. हे संकुल गुणविशेषांवर आधारित आहे जे फक्त samba4 मध्ये उपलब्ध आहे. samba4-* संकुल परस्पर samba-* संकुलांसह मतभेदीय असल्याने, ipa-server-trust-ad इंस्टॉल करण्यापूर्वी सर्व samba-* संकुलांना काढून टाकणे आवश्यक आहे.
ipa-server-trust-ad संकुल इंस्टॉल झाल्यानंतर, सर्व आइडेंटिटि मॅनेजमेंट सर्वहर्सवर व ट्रस्ट हाताळण्यासाठी आइडेंटिटि मॅनेजमेंट सुरू करण्यासाठी रेप्लिकास सुरू करण्यासाठी ipa-adtrust-install आदेश चालवायला हवे. हे झाल्यानंतर आदेशओळ ipa trust-add किंवा वेबयुआइचा वापर करून विश्वास स्थापीत करणे शक्य आहे. अधिक माहितीकरीता, https://access.redhat.com/knowledge/docs/Red_Hat_Enterprise_Linux/ वरील आइडेंटिटि मॅनेजमेंट गाइड मधील विभाग इंटिग्रेटिंग विथ ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि थ्रु क्रॉस-रिअल्म केर्बेरोज ट्रस्ट्स पहा.
389 डिरेक्ट्रि सर्व्हरकरीता पोसिक्स स्किमा समर्थन
विंडोड ॲक्टिव्ह डिरेक्ट्रि (AD), वापरकर्ता व गट नोंदणीकरीता POSIX स्किमा (RFC 2307 व 2307bis) पुरवतो. बहुतांश घटनांमध्ये, AD चा वापर युजर व गट डाटाचा अथॉरिटेटिव्ह सोअर्स म्हणून केला जातो, POSIX गुणधर्म समाविष्टीत. Red Hat Enterprise Linux 6.4 सह, डिरेक्ट्रि सर्व्हर विंडोज सिंक या गुणधर्माकडे दुर्लक्ष करतात. वापरकर्ते आता POSIX गुणधर्मांना AD व 389 डिरेक्ट्रि सर्व्हर अंतर्गत विंडोज सिंकसह समजुळणी करू शकतात.
Note
डिरेक्ट्रि सर्व्हरकरीता नवीन वापरकर्ता व गट नोंदणी समाविष्ट करतेवेळी, POSIX गुणविशेषांना AD सह सिंक केले जात नाही. AD करीता नवीन वापरकर्ता व गट नोंदणी समाविष्ट करतेवेळी डिरेक्ट्रि सर्व्हरसह समजुळणी होईल, व गुणधर्मांची समजुळणी केल्याने त्यास दोंही बाजूने सिंक्रोनाइज केले जाईल.
Chapter 6. सुरक्षा
sudoers नोंदणीच्या लूकअप्समध्ये जोडींना अधिकृतपणे घोषीत करतो
sudo युटिलिटि sudoers नोंदणी व फाइल्स किंवा LDAP मध्ये लूकअप करण्यासाठी /etc/nsswitch.conf फाइलशी संपर्क करते. पूर्वी, sudoers नोंदणीच्या डाटाबेसमध्ये जोड आढळल्यास, लूकअप कार्य इतर डाटाबेस (फाल्स समाविष्टीत) मध्ये सुरू होते. Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, /etc/nsswitch.conf फाइलमध्ये पर्याय समाविष्ट केले होते जे वापरकर्त्यांना डाटाबेस निर्देशीत करण्यास परवानगी देते ज्यानंतर sudoers नोंदणीचे जोड पुरेसे आहे. यामुळे इतर डाटाबेसची चौकशी करणे अनावश्यक ठरते; ज्यामुळे, मोठ्या वातावरणात नोंदणी लूपअपस्ची कार्यक्षमता वाढते. हे वर्तन पूर्वनिर्धारितपणे सुरू केले जात नाही व नीवडलेल्या डाटाबेसनंतर [SUCCESS=return] स्ट्रिंग समाविष्ट करून संरचीत करणे आवश्यक आहे. ह्या स्ट्रिंगच्या पहिले डाटाबेसमध्ये जोड आढळल्यास, इतर डाटाबेसची चौकशी केली जात नाही.
pam_cracklib करीता अगाऊ पासवर्ड तपासणी
pam_cracklib मॉड्युलला एकापेक्षाजास्त नवीन पासवर्ड मजबूतीची तपासणी समाविष्ट करण्यास सुधारित केली आहे:
ठराविक ओळखपटवण्याचे धोरण लांब परस्पर श्रृंखला जसे कि "abcd" किंवा "98765" समाविष्टीत पासवर्डला परवानगी देत नाही. या सुधारणामुळे, नवीन maxsequence पर्यायांचा वापर करून श्रृंखलाची कमाल लांबी मर्यादित करणे शक्य आहे.
pam_cracklib मॉड्युल तुम्हाला /etc/passwd फाइलमधील नवीन पासवर्डमध्ये GECOS क्षेत्रातील शब्दांची तपासणी करण्यास परवानगी देते. GECOS क्षेत्राचा वापर वापरकर्त्याविषयी अगाऊ माहिती साठवण्याकरीता केला जातो, जसे कि वापरकर्त्याचे संपूर्ण नाव किंवा फोन क्रमांक, ज्याचा वापर अटॅकरतर्फे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी केला जातो.
pam_cracklib मॉड्युल तुम्हाला maxrepeatclass पर्यायतर्फे पासवर्डमध्ये एकाच क्लासचे (छोटे आकार, मोठे आकार, क्रमांकिय व विशेष अक्षरे) कमाल स्वीकार्य परस्पर अक्षरे निर्देशीत करण्यास परवानगी देते..
pam_cracklib मॉड्युल आता enforce_for_root पर्यायकरीता समर्थन पुरवतो, जे रूट खातेकरीता नवीन पासवर्डसाठी कॉमप्लेक्सिटि मर्यादा पुरवते.
tmpfs पॉलिइंस्टांशिएशनकरीता आकार पर्याय
एकापेक्षाजास्त tmpfs माउंट्ससह, सर्वत्र प्रणाली मेमरिचा वापर रोखण्यासाठी आकार मर्यादीत ठेवणे आवश्यक आहे. tmpfs पॉलिइंस्टांशिएशनचा वापर करतेवेळी, /etc/namespace.conf संरचना फाइलमधील mntopts=size=<size> पर्यायचा वापर करून वापरकर्त्यांना tmpfs फाइल प्रणालीचे कमाल आकार निर्देशीत करण्यासाठी, PAMला सुधारित केले आहे.
निष्क्रीय खाती बंद करत आहे
ठराविक ओळखपटवण्याच्या धोरणांना खाते कुलूपबंद करणे आवश्यक आहे ज्याचा वापर ठराविक काळकरीता होत नाही. Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये pam_lastlog मॉड्युलकरीता अगाऊ फंक्शन समाविष्ट केले आहे, जे वापरकर्त्यांना खाती ठराविक दिवसानंतर कुलूपबंद करण्यासाठी परवानगी पुरवते.
libica करीता ऑपरेशनचे नवीन मोड्स
libica लाइब्ररि, ज्यामध्ये IBM सिस्टम z वरील आयबिएम सर्व्हर क्रिप्टोग्राफिक ॲक्सिलरेटर (ICA) हार्डवेअरच्या प्रवेशकरीता फंकशन्स व युटिलिजचा संच समाविष्टीत आहे, त्यास सेंट्रल प्रोसेसर असिस्ट फॉर क्रिप्टोग्राफिक फंक्शन (CPACF) मधील मेसेज सेक्युरिटि असिस्ट एक्सटेंशन 4 सूचनांकरीता समर्थन पुरवण्याकरीता नवीन अल्गोरिदम्सचा वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे. DES व 3DES ब्लॉक सिफर्सकरीता खालील ऑपरेशनचे मोड समर्थीत आहे:
सिस्टम झिकरीता zlib कम्प्रेशन लाइब्ररिचे ऑप्टिमाइझेशन, व सपोर्ट
zlib लाइब्ररि, सर्वसाधरण लॉसलेस डाटा कम्प्रेशन लाइब्ररि, यास आय.बि.एम. सिस्टम झि वरील कम्प्रेशन कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुधारित केले आहे.
फॉलबॅक फायरवॉल संरचना
पूर्वनिर्धारित संरचना लागू करणे अशक्य असल्यास iptables व ip6tables सर्व्हिसेस आता फॉलबॅक फायरवॉल संरचना लागू करण्याची क्षमता पुरवते. /etc/sysconfig/iptables पासूनचे फायरवॉल नियम अपयशी झाल्यास, फॉलबॅक फाइल लागू होते, अस्तित्वात असल्यास. फॉलबॅक फाइलला /etc/sysconfig/iptables.fallback असे नाव दिले जाते व iptables-save फाइल रूपणचा ( /etc/sysconfig/iptables प्रमाणे) वापर करते. फॉलबॅक फाइल अपयशी झाल्यास, पुढील फॉलबॅक होत नाही. फॉलबॅक फाइल निर्माण करण्यासाठी, मानक फायरवॉल संरचना साधनांचा वापर करा व फाइलचे पुनःनामांकन किंवा प्रत बनवा. ip6tables सर्व्हिसकरीता समान प्रक्रियेचा वापर करा, फक्त “iptables” चे सर्व अकरंसेसला “ip6tables” सह अदलाबदल करा.
Chapter 7. एंटाइटलमेंट
स्ट्रिंग सुधारणा
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, अनेक स्ट्रिंग्सना सबस्क्रिप्शन मॅनेजरमध्ये पुन्हा नामांकीत केले आहे:
subscribe यास attach असे पुनः नाव दिले
auto-subscribe यास auto-attach असे पुनः नाव दिले
unsubscribe यास remove असे पुनःनाव दिले
consumer यास system किंवा unitअसे पुनः नाव दिले
प्रॉक्सी जोडणीची चाचणी करत आहे
प्रॉक्सी संरचना संवाद आता मूल्य दिल्यानंतर वापरकर्त्यांना प्रॉक्सीसह जोडणी तपासण्यास परवानगी देतो.
एकापेक्षा जास्त एंटाइटलमेंट्स सबस्क्राइब किंवा सबस्क्राइब अशक्य करा
सिरिअल क्रमांकाचा एकाचवेळी वापर करून, सबस्क्रिप्शन मॅनेजर आता एकापेक्षा जास्त एंटाइटलमेंट्सकरीता सबस्क्राइब (जोडणी) किंवा सबस्क्राइब अशक्य (काढून टाकणे) होऊ शकतो.
GUI मध्ये ॲक्टिवेशन किजचे समर्थन
सबस्क्रिप्शन मॅनेजर ग्राफिकल युजर इंटरफेस आता तुम्हाला ॲक्टिवेशन कि याचा वापर करून प्रणालीची नोंदणी करण्यास सहमती देतो. ॲक्टिवेशन किज तुम्हाला प्रणालीची नोंदणी करण्यापूर्वी वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन्स पूर्वसंरचीत करण्यास परवानगी देतो.
बाहेरिल सर्व्हर्स् विरूद्ध नोंदणी करत आहे
प्रणालीची नोंदणी होतेवेळी रिमोट सर्व्हरच्या नीवडकरीता समर्थन आता सबस्क्रिप्शन मॅनेजरमध्ये समर्थीत आहे. सबस्क्रिप्शन मॅनेजर नोंदणी प्रोसेसवेळी, पोर्ट व प्रिफिक्ससह, सर्व्हरचे URL पसंत करण्यासाठी वापरकर्ता संवाद पर्याय पुरवतो. या व्यतिरिक्त, आदेशओळपासून नोंदणी करताना, --serverurl चा वापर नोंदणी करण्यासाठीचे सर्व्हर निर्देशीत करण्यास शक्य करतो. ह्या गुणधर्मविषयी अधिक माहितीकरीता, रेजिस्टरिंग, अनरेजिस्टरिंग, अँड रेजिस्टरिंग ए सिस्टम पहा, सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट गाइड मध्ये.
GUI मधील युजेबिलिटि बदल
सबस्क्रिप्शन मॅनेजर GUI ग्राहक प्रतिसादावर आधारित विविध बदलांसह सुधारित केले आहे.
virtio-SCSI (SCSI वर आधारीत KVM करीता स्टोरेज आर्किटेक्चर) क्षमताच्या व्यतिरीक्त KVM वर्च्युअलाइजेशनचे स्टोरेज स्टॅक सुधारीत झाले आहे. Virtio-SCSI, SCSI LUNs सह प्रत्यक्षरित्या जोडणी करण्यास सुविधा पुरवते व virtio-blk च्या तुलनेत स्केलेबिलिटि सुधारीत करते. virtio-SCSI चा फायदा म्हणजे virtio-blk, जे फक्त अंदाजे २५ साधने व एकापेक्षा जास्त PCI स्लॉट्स हाताळू शकते, याच्या तुलनेत शंभरपेक्षा अधिक साधने हाताळण्यास सक्षम आहे.
Virtio-SCSI आत्ता खालील क्षमतासह लक्ष्य साधनाचे गुणविशेष संच प्राप्त करण्यास सक्षम आहे:
virtio-scsi कंट्रोलरतर्फे वर्च्युअल हार्ड ड्राइव्ह किंवा CD समाविष्ट करा,
QEMU scsi-block साधनतर्फे यजमानपासून अतिथीकरीता फिजिकल SCSI साधन पास करा,
व प्रत्येक अतिथीकरीता शंभर साधनांचा वापर स्वीकारा; virtio-blk च्या ~25-डिव्हाइस मर्यादाकरीता सुधारणा.
virtio-scsi ला Red Hat Enterprise Linux 6.3 मध्ये टेकनॉलजि प्रिव्ह्यु म्हणून सादर करण्यात आले व Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये संपूर्ण समर्थन पुरवते. सर्वात नवीन virtio-win ड्राइव्हर्ससह विंडोज अतिथीकरीता (विंडोज एक्सपि) देखील समर्थन पुरवले जाते.
इंटेलच्या नेक्स्ट-जनरेशन कोर प्रोसेसरकरीता समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.4 qemu-kvm च्या इंटेलच्या नेक्स्ट-जनरेशन कोर प्रोसेसरकरीता समर्थन पुरवतो ज्यामुळे प्रोसेसरतर्फे पुरवलेल्या नवीन गुणविशेष KVM अतिथी वापर करू शकेल, महत्वाचे खालील प्रमाणे आहेत: ॲडवांस्ड वेक्टर एक्सटेंशन्स 2 (AVX2), बिट-मॅनिपुलेशन इंस्ट्रक्शन्स 1 (BMI1), बिट-मॅनिपुलेशन इंस्ट्रक्शन्स 2 (BMI2), हार्डवेअर लॉक एलिशन (HLE), रेस्ट्रिक्टेड ट्रांजॅक्शनल मेमरि (RTM), प्रोसेस-कंटेक्स्ट आइडेंटिफायर (PCID), इंवालिडेट प्रोसेस-कंटेक्स्ट आइडेंटिफायर (INVPCID), फ्युज्ड मल्टिप्लाय-ॲड (FMA), बिग-एंडियन मोव्ह इंस्ट्रक्शन (MOVBE), एफ सेगमेंट व जि सेगमेंट BASE इंस्ट्रक्शन (FSGSBASE), सुपरवाइजर मोड एक्जिक्युशन प्रिवेंशन (SMEP), एंहांस्ड REP MOVSB/STOSB (ERMS).
ए.एम.डि ऑप्टेरॉन 4xxx सिरिज CPU करीता सपोर्ट
एएमडि ऑप्टेरॉन 4xxx सिरिज प्रोसेरला आता qemu-kvm तर्फे समर्थन पुरवले आहे. यामुळे ह्या सिरिजचे नवीन गुणविशेषांना KVM अतिथीकरीता खुले केले जाते, जसे कि: F16C इंस्ट्रक्शन सेट, ट्रेलिंग बिट मॅनिपुलेशन, बिट-मॅनिपुलेशन इंस्ट्रक्शन्स 1 (BMI1) डेसिमेट फंक्शन्स, व फ्युज्ड मल्टिप्लाय-ॲड (FMA) इंस्ट्रक्शन सेट.
SPICE च्या सहाय्याने USB फॉरवर्डिंगचा वापर करून गेस्ट लाइव्ह माइग्रेशन
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, KVM SPICE च्या सहाय्याने USB फॉरवर्डिंगचा वापर करून गेस्ट लाइव्ह माइग्रेशनकरीता समर्थन पुरवतो, त्याचबरोबर सर्व संरचीत केलेल्या साधनांकरीता अस्तित्वातील USB साधन रिडाइरेक्शन सुस्थीत केले जातात.
USB साधनांचा वापर करून गेस्टचे लाइव्ह माइग्रेशन
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, USB साधनांसह KVM अतिथींच्या लाइव्ह माइग्रेशनकरीता समर्थन पुरवतो. खालील साधनांना समर्थन पुरवले जाते: एंहांस्ड होस्ट कंट्रोलर इंटरफेस (EHCI) व युनिव्हर्सल होस्ट कंट्रोलर इंटरफेस (UHCI) लोकन पासथ्रु व एम्युलेटेड साधने जसे कि स्टोरेज साधने, माइस, किबोर्ड, हब्स, व इतर.
QEMU गेस्ट एजंटला सुधारित केले
QEMU गेस्ट एजंटला (qemu-guest-agent संकुलतर्फे पुरवलेले) आता संपूर्णरित्या Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये समर्थन पुरवले आहे. त्यास अपस्ट्रिम आवृत्ती 1.1 करीता सुधारित केले आहे, व खालील लक्षणीय सुधारणा व बग निवारण समाविष्टीत केले आहे:
guest-suspend-disk व guest-suspend-ram आदेशांना आता विंडोज प्रणालीवर RAM किंवा डिस्ककरीता सस्पेंड करणे शक्य आहे.
guest-network-get-interfaces आदेशचा वापर आता लिनिक्सवरील नेटवर्क माहिती प्राप्त करण्यास शक्य आहे.
हि सुधारणा फाइल सिस्ट फ्रिज सपोर्ट सुधारणा व निवारण पुरवते.
या सुधारणामध्ये विविध दस्तऐवजीकरण निवारण व छोटी सुधारणा समाविष्टीत आहे.
Red Hat Enterprise Linux 6.3 व जुणे चालवणाऱ्या यजमान व अतिथींना प्रत्येक इंटरप्टकरीता दोन VM एक्जिट्स (VM पासून हाइपरवाइजरकरीता कंटेकस्ट स्विचेस) आवश्यक आहे: एक इंटरप्ट इंजेक्ट करण्यासाठी, व दुसरे इंटरप्ट समाप्तिचे संकेत कळवण्यासाठी. जेव्हा दोंही यजमान व अतिथी प्रणालींना Red Hat Enterprise Linux 6.4 किंवा नवीनकरीता सुधारित केले जाते, पॅरावर्च्युअलाइज्ड एंड-ऑफ-इंटरप्ट गुणविशेष नेगोशिएट करून एका इंटरप्टकरीता एक स्विच असे निश्चित करू शकतात. परस्पररित्या, Red Hat Enterprise Linux 6.4 किंवा नवीन याचा दोंही यजमान व अतिथी म्हणून वापर केल्यास, इंटरप्ट-निर्देशीत वर्कलोड्सकरीता एक्जिट्सची संख्या अर्धेकरीता निश्चित केले जाते, जसे कि virtio नेटवर्क साधनासह येणारे नेटवर्क ट्राफिक. यामुळे या प्रकारच्या वर्कलोड्सकरीता यजमान CPU वापरमध्ये घट निर्माण होते. लक्षात ठेवा फक्त एड्ज इंटरप्ट्स सुधारित केले जातात: उदाहरणार्थ e1000 नेटवर्किंग स्तरिय इंटरप्टस्चा वापर करते व त्यास सुधारित केले नाही.
संयोजनाजोगी साउंड पास-थ्रु
साउंड साधनाला आता अतिथी प्रणालीमध्ये microphone किंवा speaker म्हणून शोधणे शक्य आहे (line-in व line-out प्रमाणे शोधण्याऐवजी). साउंड साधने आता अतिथी ॲप्लिकेशन्समध्ये योग्यरित्या कार्य करू शकतात जे व्हॉइस रेकॉर्डिंग व ऑडिओकरीता ठराविक प्रकारचे इंपुट स्वीकारतात.
8.2. हायपर-V
समावेष, व गेस्ट इनस्टॉलेशन समर्थनकरीता, Microsoft हायपर-V ड्राइव्हर्स्
इंटिग्रेटेड Red Hat Enterprise Linux अतिथी इनस्टॉलेशन, व माइक्रोसॉफ्ट हायपर-V वरील Red Hat Enterprise Linux 6.4 मधील हायपर-V पॅरा-वर्च्युअलाइज्ड डिव्हाइस सपोर्ट वापरकर्त्यांना माइक्रोसॉफ्ट हायपर-V हाइपरवाइजर्स् वरील Red Hat Enterprise Linux 6.4 यास अतिथी म्हणून चालवण्यास परवागनी देते. खालील हायपर-V ड्राइव्हर्स् व क्लॉक स्रोतला Red Hat Enterprise Linux 6. सह शिप केलेल्या कर्नलमध्ये समाविष्ट केले आहे:
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये हायपर-V करीता क्लॉक सोअर्स व गेस्ट हायपर-V कि-वॅल्यु जोड (KVP) डिमन (hypervkvpd) प्रमाणे समर्थन समाविष्ट केले आहे जे यजमानकरीता VMbus तर्फे मूळ माहिती, जसे कि अतिथी IP, FQDN, OS नाव, व OS प्रकाशन क्रमांक पुरवते.
8.3. विएमवेअर इएसएक्स
विएमवेअर पिवि ड्राइव्हर्स
VMware ESX मध्ये Red Hat Enterprise Linux 6.4 चालवताना व्हिएमवेअर पॅरा-वर्च्युअलाइज्ड ड्राइव्हर्सला सिमलेस आउट-ऑफ-द-बॉक्स अनुभव पुरवण्यास सुधारित केले आहे. ॲनाकाँडा इंस्टॉलरला इनस्टॉलेशन प्रक्रियेवेळी ड्राइव्हरच्या सूचीकरीता सुधारित केले आहे. खालील ड्राइव्हर्स सुधारित केले आहे:
नेटवर्क ड्राइव्हर (vmxnet3)
स्टोरेज ड्राइव्हर (vmw_pvscsi)
मेमरि बलूनिंग ड्राइव्हर (vmware_balloon)
माउस ड्राइव्हर (vmmouse_drv)
व्हिडिओ ड्राइव्हर (vmware_drv)
Chapter 9. क्लस्टरिंग
IBM iPDU फेंस साधनकरीता समर्थन
IBM iPDU फेंस साधनकरीता Red Hat Enterprise Linux 6.4 समर्थन समाविष्ट करतो. या फेंस साधनाविषयी अधिक माहितीकरीता, फेंस डिव्हाइस पॅरामिटर्स अपेंडिक्स, Red Hat Enterprise Linux 6 मधील क्लस्टर ॲडमिनिस्ट्रेशन पुस्तिका पहा.
इएटन नेटवर्क पावर कंट्रोलर फेंस साधनकरीता समर्थन
इएटॉन ओवर SNMP नेटवर्क पावर स्विचकरीता फेंस एजंटकरीता, Red Hat Enterprise Linux 64 समर्थन समाविष्ट करतो. या फेंस साधनाविषयी अधिक माहितीकरीता, फेंस डिव्हाइस पॅरामिटर्स अपेंडिक्स, Red Hat Enterprise Linux 6 मधील क्लस्टर ॲडमिनिस्ट्रेशन पुस्तिका पहा.
नवीन keepalived संकुल
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये keepalived संकुल टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे. लोड-बॅलेंसिंग व हाय-अव्हलेबिलिटिकरीता keepalived संकुल सोपे व दर्जेदार कार्यक्षमता पुरवते. लोड-बॅलेंसिंग फ्रेमवर्क परिचीत व लेयर 4 नेटवर्क लोड-बॅलेंसिंग पुरवणाऱ्या लिनक्स वर्च्युअल सर्व्हर कर्नल मॉड्युलवर आधारित आहे. स्तरप्रमाणे लोड-बॅलेंस्ड सर्व्हर पूल्सकरीता keepalived डिमन हेल्थ चेकर्सचा संच लागू करतो. keepalived डिमन वर्च्युअल राउटर रिडंडंसि प्रोटोकॉ (VRRP) देखील लागू करतो, ज्यामुळे राउटर किंवा डाइरेक्टर फेलओवरकरीता हाय अव्हेलिबिलिटि स्वीकारले जाते.
वॉचडॉग रिकवरि
नवीन fence_sanlock व checkquorum.wdmd फेंस एजंट्स, Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे, वॉचडॉग साधनतर्फे नोडच्या रिकव्हरिकरीता नवीन पद्धती पुरवते. हे टेक्नॉलजि प्रिव्युउ कसे सुरू करायचे याविषयी ट्युटोरिल्स https://fedorahosted.org/cluster/wiki/HomePage येथे उपलब्ध होतील.
VMDK-आधारित स्टोरेजकरीता समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.4 मल्टि-राइटर पर्यायसह वेमवेअरच्या VMDK (वर्च्युअल मशीन डिस्क) डिस्क प्रतिमा टेक्नॉलजिचा वापर करणाऱ्या क्लस्टर्सकरीता समर्थन पुरवतो. हे तुम्हाला, उदाहरणार्थ, क्लस्टर्ड फाइल प्रणाली जसे कि GFS2 करीता मल्टि-राइटर पर्यायसह VMDK-आधारित स्टोरेजचा वापर .
Chapter 10. स्टोरेज
पॅरलल NFS फूल्ली सपोर्टेड
पॅरलल NFS (pNFS) NFS v4.1 मानकाचे भाग आहे जे क्लाएंट्सला स्टोरेज साधनांना प्रत्यक्षरित्या व पॅरललमध्ये प्रवेश प्राप्त करण्यास मदत करते. अनेक वर्कलोड्सकरीता pNFS आर्किटेक्चर NFS सर्व्हर्सची स्केलेबिलिटि व कामगिरि सुधारित करू शकतो. In Red Hat Enterprise Linux 6.4, pNFS पूर्णतया समर्थीत आहे.
pNFS तीन वेगळ्या स्टोरेज प्रोटोकॉल्स् किंवा मांडणीकरीता समर्थन पुरवते: फाइल्स्, ऑब्जेक्ट्स्, व ब्लॉक्स्. Red Hat Enterprise Linux 6.4 NFS क्लाएंट फाइल्स् लेआऊट प्रोटोकॉलकरीता समर्थन पुरवते.
हि नवीन कार्यक्षमता सुरू करण्यासाठी pNFS-सुरू सर्व्हरपासून माउंट्सवर खालील माउंट पर्यायचा वापर करा: -o minorversion=1 किंवा -o v4.1.
सर्व्हर pNFS-सुरू असल्यास, nfs_layout_nfsv41_files कर्नल मॉड्युल स्वयंरित्या प्रथम माउंटपासून लोड केले जाते. हे मॉड्युल लोड झाले आहे याच्या तपासणीकरीता खालील आदेशचा वापर करा:
माउंटेड फाइल प्रणालीवरील ऑनलाइन डिस्कार्ड कार्य फाइल प्रणालीतर्फे वापरणीत नसलेले ब्लॉक्स वगळतो. ऑनलाइन डिस्कार्ड कार्ये आता XFS फाइल प्रणालीवर समर्थीत आहे. अधिक माहितीकरीता, विभाग डिसकार्ड अनयुज्ड ब्लॉक्स पहा, Red Hat Enterprise Linux 6 स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन गाइड.
माइक्रॉन PCIe SSD करीता LVM समर्थन
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये, LVM हे माइक्रॉन PCIe सॉलिड स्टेट ड्राइव्हस (SSDs) करीता वॉल्युम ग्रूपचे भाग म्हणून समर्थन पुरवते.
2-वे मिरर RAID10 करीता LVM समर्थन
LVM आता RAID10 लॉजिकल वॉल्युम्सचे निर्माण, काढून टाकणे, व पुनःनामांकनकरीता सक्षम आहे. RAID10 लॉजिकल वॉल्युम निर्माण करण्यासाठी, इतर RAID प्रकार प्रमाणे, खालील प्रकारे सेगमेंट प्रकार निर्देशीत करा:
लक्षात ठेवा -m व -i आर्ग्युमेंट्स इतर सेगमेंट प्रकारेच वर्तन करते. म्हणजेच, -i एकूण स्ट्राइप्स आहेत तर -m प्रतची (अगाऊ) संख्या आहे (म्हणजेच, -m 1 -i 2 2-वे मिरर्सच्या शीर्षकरीता 2 स्ट्राइप्स दाखवतो).
यापूर्वी, मल्टिपाथ साधनांवर पर्सिस्टंट रिजर्वेशन्स स्थापीत करण्यासाठी, सर्व मार्ग साधनांवर मांडणी निश्चित करणे आवश्यक होते. मार्ग साधानाल नंतर समाविष्ट केल्यास, त्या मार्गकरीता स्वहस्ते आरक्षणे समाविष्ट करणे आवश्यक होते. Red Hat Enterprise Linux 6.4 mpathpersist आदेशसह SCSI पर्सिस्टंट आरक्षणांची मांडणी ठरवण्यास व व्यवस्थापीत करायची क्षमता पुरवतो. मार्ग साधन समाविष्ट केल्यानंतर, पर्सिस्टंट रिजर्वेशन त्या साधनांवर देखील समाविष्ट केले जातात.
Chapter 11. कंपाइलर व साधने
सिस्टमटॅपला आवृत्ती 1.8 करीता सुधारित केले
SystemTap हे ट्रेसिंग व प्रोबिंग साधन आहे जे वापरकर्त्यांना कार्य प्रणालीचा अभ्यास व क्रिया नियंत्रीत करण्यासाठी तपशीलमध्ये सोय पुरवतो (विशेषतया, कर्नल). netstat, ps, top, व iostat साधनांच्या आऊटपुट प्रमाणेच माहिती पुरवली जाते; तरी, SystemTap ची रचना अधिक फिल्टरिंग व गोळा केलेल्या माहितीकरीता विश्लेषण पर्याय पुरवण्यासाठी केली आहे.
systemtap संकुलला Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये अपस्ट्रिम आवृत्ती 1.8 करीता सुधारित केले आहे, जे बग निवारन व सुधारणा पुरवते:
uprobe व kprobe हँडलर्स् (प्रोसेस, कर्नल, मॉड्युल) मधील DWARF वेरियेबल्सकरीता प्रवेशसाठी, @var मांडणी आता वैकल्पिक भाषा मांडणी आहे.
टॅपसेटमध्ये समाविष्ट केलेल्या C हेडर्ससह मतभेद टाळण्यासाठी सिस्टमटॅप आता स्थानीय वेरियेबल्स् मँगल करतो.
सिस्टमटॅप कंपाईल-सर्व्हर व क्लाएंट आता IPv6 नेटवर्कस् करीता समर्थन पुरवते.
स्क्रिप्ट्स् पासून कमी-थ्रुपुट आउटपुट आउटपुटचे पोल करण्याकरीता, सिस्टमटॅप रनटाइम (staprun) आता कमी वारंवार वेकअप्स् स्वीकारण्यासाठी -T वेळसमाप्ति पर्याय स्वीकारते.
सिस्टमटॅप स्क्रिप्ट ट्रांसलेटर ड्राइव्हर (stap) आता खालील स्रोत मर्यादा पर्याय पुरवते:
सिस्टमटॅप मॉड्युल्स् आता लहान आहेत व वेगवानरित्या कंपाइल करतात. मॉड्युलचे डिबगइंफो आता पूर्वनिर्धारितपणे सप्रेस केले जाते.
बग CVE-2012-0875 (दोषीत DWARF अनवाइंड डाटा विश्लेषीत करतेवेळी त्रुटी) आता निवारन झाले आहे.
lscpu व chcpu युटिलिटिज
lscpu युटिलिटि, जे उपलब्ध CPUs विषयी तपशील माहिती दाखवते, यास विविध नवीन गुणविशेष समाविष्ट करण्यास सुधारित केले आहे. तसेच, नवीन युटिलिटि, chcpu, समाविष्ट केले आहे, जे तुम्हाला CPU स्तर (ऑनलाइन/ऑफलाइन, स्टँडबाय/ॲक्टिव्ह, व इतर स्तर) बदलण्यास, CPUs बंद करणे व सुरू करण्यास, व निर्देशीत CPUs संरचीत करण्यास परवानगी देते.
या युटिलिटिजविषयी अधिक माहितीकरीता, lscpu(1) व chcpu(8) मॅन पृष्ठ पहा.
Chapter 12. सामान्य सुधारणा
samba संकुलांना सुधारित केले
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये रिबेस्ड sambax संकुल समाविष्टीत आहे ज्यामुळे अनेक बग निवारण व सुधारणा प्रस्तुत होतात, ज्यापैकी महत्वाचे यास SMB2 प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केले जाते. /etc/samba/smb.conf फाइलच्या [global] विभागात, SMB2 समर्थन खालील घटकासह सुरू करणे शक्य आहे:
max protocol = SMB2
व्यातिरिक्त, साम्बाकडे AES केर्बेरोज एंक्रिप्शनकरीता समर्थन आहे. विंडोज विस्टा व विंडोज सर्वहर 2008 पासून, AES समर्थन माइक्रोसॉफ्ट विंडोज कार्यप्रणालीत उपलब्ध आहे. विंडोज 7 पासून हे नवीन कर्बेरोज एंक्रिप्शन आहे. साम्बा आता नियंत्रणजोगी किटॅब्जकरीता AES केर्बेरोज किज पुरवतो. याचा अर्थ इतर कर्बेराइज्ड सेवा जे साम्बा किटॅबचा वापर करतात व समान मशीनवर चालते, AES एंक्रिप्शनपासून फायदा प्राप्त करू शकते. AES सत्र किज्चा वापर करण्यासाठी (व AES एंक्रिप्टेड टिकिट ग्रांटिंग तिकिट्सचा वापर करायचे असल्यास), ॲक्टिव्ह डिरेक्ट्रिच्या LDAP सर्व्हरमधील साम्बा मशीन खात्याला स्वहस्ते संपादित करणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरीता, माइक्रोसॉफ्ट ओपन स्पेसिफिकेशन्स सपोर्ट टिम ब्लॉग पहा.
Warning
सुधारित sambax संकुल ID मॅपिंगचे पद्धती बदलते. वापरकर्त्यांना सध्याची साम्बा संरचना फाइल्स् संपादित करण्यासाठी सूची केले जाते.
विविध ट्रिविअल डाटाबेस (TDB) फाइल्स सुधारित केले आहे व छपाई समर्थनला प्रत्यक्ष रेजिस्ट्रि लागूकरणचा वापरकरीता पुन्हा लिहले गेले आहे. याचा अर्थ सर्व TDB फाइल्सला smbdच्या सर्वात नवीन आवृत्तीसह सुरू करण्यासाठी सुधारित केले आहे. TDB फाइल्सचे बॅकअप्सविना जुणे साम्बा 3.x आवृत्तीकरीता डाउनग्रेड करणे अशक्य.
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये नवीन scipy संकुल समाविष्टीत आहे. SciPy संकुल गणित, तंत्रज्ञान, व अभियांत्रिकिकरीता सॉफ्टवेअर पुरवते. NumPy संकुल, ज्याची रचना रेकॉर्डसे मोठे मल्टि-डाइमेंशनल अरेज्च्या रचनाकरीता केला जातो, SciPy करीता कोर लाइब्ररि आहे. SciPy लाइब्ररिचे निर्माण NumPy अरेजसह कार्य करण्यासाठी केला आहे व विविध संख्यायीक रूटिन्स पुरवतात, उदाहरणार्थ न्युमेरिकल इंटिग्रेशन व ऑप्टिमाइजेशनकरीता रूटिन्स.
NSS मधील TLS v1.1 समर्थन
nss व nss-util संकुलांना अपस्ट्रिम आवृत्ती 3.14 करीता सुधारित केले आहे, ज्यामुळे, इतर गुणविशेष, TLS आवृत्ती 1.1 करीता समर्थन पुरवले आहे. तसेच, nspr संकुलला आवृत्ती 4.9.2 करीता रिबेस केले आहे. अधिक माहितीकरीता, NSS 3.14 प्रकाशन टिपा पहा.
एम्बेडेड वालग्रिंड gdbserver
valgrind संकुलला अपस्ट्रिम आवृत्ती 3.8.1 करीता सुधारित केले आहे. या सुधारित आवृत्तीमध्ये, इतर सुधारणा व बग निवारणच्या व्यतिरिक्त, एम्बेडेड gdbserver पुरवले जाते. अधिक माहितीकरीता, वालग्रिंड धडा व वालग्रिंड 3.8.1 मधील बदल अपेंडिक्स, Red Hat डेव्हलपर टूलसेट 1.1 युजर गाइड पहा.
नवीन libjpeg-turbo संकुल
Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये संकुलांचे नवीन संच समाविष्टीत आहे: libjpeg-turbo. हे संकुल पारंपारिक libjpeg संकुलांना बदलते, व समान कामगिरि व API यास libjpeg म्हणून पुरवते परंतु उत्तम कामगिरिसह.
नवीन redhat-lsb-core संकुल
redhat-lsb संकुल इनस्टॉल करताना, LSB मानकशी संलग्न होण्याकरीता प्रणालीमध्ये अनेक अवलंबनांना प्रणालीमध्ये पूल केले जाते. Red Hat Enterprise Linux 6.4 तुम्हाला नवीन redhat-lsb-core उपसंकुल पुरवते जे तुम्हाला redhat-lsb-core संकुल इन्सटॉल करून आवश्यक संकुलांचे किमान संच प्राप्त करण्यास परवागनी देते.
createrepo युटिलिटि सुधारित केली
createrepo युटिलिटिला नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे लक्षणीयरित्या मेमरि वापर कमी करते व --workers पर्यायचा वापर करून मेमरि वापर कमी करते.
आवृत्ती इतिहास
Revision History
Revision 1.2-0
Thu Feb 21 2013
MartinPrpič
Release of the Red Hat Enterprise Linux 6.4 Release Notes.